India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमाबाईने घेतली पंतप्रधानांची भेट

India Darpan by India Darpan
March 21, 2023
in राष्ट्रीय
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महिला दिनानिमित्त नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणा-या चिंचवडच्या रमाबाईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून ही भेट झाली. संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे, काय अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन करत पंतप्रधान मोदी यांनी रमाबाईला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

चिंचवड येथील रहिवासी असलेल्या रमिला लटपटे अहिल्या फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत. आता ‘रमा’ (रायझिंग एबल मॅनकाईंड ऑल राऊंड) या जगभ्रमंती मोहिमेअंतर्गत त्या जगभ्रमंती करत आहेत. मुंबईतील गेट-वे-ऑफ इंडिया येथून त्यांच्या भ्रमंतीच्या प्रवासाचा ९ मार्च रोजी प्रारंभ झाला. त्या ८ मार्च २०२४ ला पुन्हा भारतात परतणार आहे.

रमिला लटपटे नऊवारी नेसून, नथ घालून ४० देशात जगभ्रमंती करत आहे. पुढीलवर्षीच्या ८ मार्च रोजी ती भारतात परत येणार आहे. पिंपरी-चिंचवड येथून सुरु झालेला प्रवास आज 1572 किलोमीटर मोटरसायकल चालवत दिल्ली मध्ये पोहचला आहे. पंतप्रधान मोदी यांनी तत्काळ वेळ दिली आणि आज भेट झाली. संपूर्ण देश तुझ्यासोबत आहे. तुला काहीही अडचण आली. तरी माझ्या कार्यालयाशी संपर्क साध, संपूर्ण सहकार्य केले जाईल. व्हिजाची समस्या सोडविली जाईल. माझे आशिर्वाद तुझ्यासोबत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी स्वीय सहाय्यकाला बोलवून घेत रमाबाईला पूर्णपणे सहकार्य करण्याच्या सूचना केल्या असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना गुढी भेट दिली.

याबाबतची माहिती देताना रमाबाई म्हणाल्या, सहा खंड, ४० देशामध्ये नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणार आहे. भारत की बेटी म्हणून मी दुचाकीवरुन जगभ्रमंती करत आहे. लघुउद्योग, बचतगट आणि भारताच्या कलागुणांचा जगभर प्रसार करणार आहे. त्यामुळे पूर्ण भारत माझ्यासोबत आहे असा विश्वास आहे. ८ मार्च २०२४ रोजी मी भारतात परत येणार आहे. मुंबईतील इंडिया गेट येथून ९ मार्चपासून प्रवासाला सुरुवात केली. तेथून १८०० किलोमीटरचे अंतर कापून आज दिल्लीत पोहोचली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. त्यांनी मला शुभेच्छा आणि आशिर्वाद दिले आहेत. जगभ्रमंतीसाठी खासदार बारणे यांचे सहकार्य मिळत आहे

Maharashtra Young Girl 2 Wheeler World Tour Meet PM Modi


Previous Post

विजय सेल्सचा गुढीपाडवा सेल; विविध उत्पादनांवर ६० टक्क्यांहून अधिक सवलत

Next Post

लागा तयारीला राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित

Next Post

लागा तयारीला राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित

ताज्या बातम्या

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २४०, तर जखमींची संख्या १ हजारावर

June 3, 2023

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

June 3, 2023

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

June 3, 2023

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

June 3, 2023

झंझटच मिटली… कोरड्या हवामानात आणि अत्यल्प पाण्यात टिकणार ही वनस्पती.. शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

June 3, 2023
विमानसेवेचे प्रातिनिधीक छायाचित्र

विमान तिकीटावर ४० टक्के, हॉटेल बुकींग्जवर ६० टक्के सूट; असा घेता येईल लाभ

June 3, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group