शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ईश्वरी सावकारच्या नेतृत्वात महाराष्ट्राची विजयी सुरुवात; अरुणाचल प्रदेशवर ६ गडी राखून विजय

डिसेंबर 7, 2022 | 6:52 pm
in राष्ट्रीय
0
IMG 20221207 WA0041

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड सार्थ ठरवत विजयी सुरुवात केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला एकदिवसीय सामन्यांच्या डेहराडून येथे सुरू झालेल्या स्पर्धेत , महाराष्ट्र संघाने अरुणाचलवर ६ गडी राखून विजय मिळवला. नाशिकची अष्टपैलु शाल्मली क्षत्रियची देखील या महाराष्ट्र संघात आहे.

महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धे नंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित, राष्ट्रीय पातळीवरील १९ वर्षांखालील महिला एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी देखील  महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे ईश्वरी सावकारची कर्णधारपदी निवड कायम ठेवण्यात आली आहे.  नुकतीच श्रीलंका व वेस्ट इंडीज विरुद्धच्या चौरंगी मालिकेत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या ईश्वरी सावकारने १९ वर्षांखालील इंडिया बी संघातर्फे सलामीला फलंदाजीला येत प्रभावी कामगिरी केली होती. मागील हंगामात ईश्वरी सावकारची चॅलेंजर ट्रॉफी साठी महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात देखील निवड झालेली होती . तसेच सुरत येथे झालेल्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित, राज्यस्तरीय महिला ५० षटकांच्या स्पर्धेत महाराष्ट्र क्रिकेट संघातर्फे सलामीवीर म्हणुन खेळताना ईश्वरी सावकार ने फलंदाजीचे जोरदार प्रदर्शन केले होते .

नाशिक जिल्हा क्रिकेट संघ सदस्य अष्टपैलु शाल्मली क्षत्रिय उदयोन्मुख जलदगती गोलंदाज व सलामीवीर आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वेळोवेळी झालेल्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत या केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच आधी महाराष्ट्राच्या संभाव्य संघात व आता अंतिम संघात निवड झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला नाशिक येथे पार पडलेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट ( इन्व्हिटेशन लीग ) स्पर्धेत शाल्मलीने सर्वोच्च ५७ धावसंख्येसह ३ डावात एकूण ८७ धावा केल्या व अतिशय मोक्याच्या क्षणी दोन महत्वाचे बळी घेत नाशिक संघाला विजयी केले होते.

अरुणाचल संघाला ७४ धावांत रोखत विजयासाठीच्या ७५ धावा ४ गड्यांच्या मोबदल्यात करून अरुणाचलवर ६ गडी राखून विजय मिळवला.  शाल्मली क्षत्रियने ४ षटकांत  १० धावा दिल्या तर ईश्वरी सावकारने ११ धावा केल्या. महाराष्ट्राचा  पुढील सामना  ८ डिसेंबरला पॉंडेचरी बरोबर आहे. या विजयाबद्दल  नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे व प्रशिक्षक यांनी ईश्वरी सावकार व शाल्मली क्षत्रियचे अभिनंदन करून पुढील  कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Maharashtra Women T20 Match Win Ishwari Sawkar
Cricket Sports

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोग : थेट मुलाखतीद्वारे होणाऱ्या भरतीचे निकाल जाहीर

Next Post

नाशिक विभागात लोकसहभागातून तब्बल १७१९ बंधारे पूर्ण; इतक्या हेक्टर क्षेत्रावरील पिके येणार ओलीताखाली

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
jalsandharan irrigation lake e1654529727810

नाशिक विभागात लोकसहभागातून तब्बल १७१९ बंधारे पूर्ण; इतक्या हेक्टर क्षेत्रावरील पिके येणार ओलीताखाली

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011