मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ता संघर्षाचा फैसला आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींनाही वेग आला आहे. या घडामोडी नेमक्या काय आहेत ते…
– आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेने तातडीने बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार, नगरसेवक आणि सर्वांनाच उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या निकालानंतरची व्यूहरचना यात ठरणार असल्याचे बोलले जाते.
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी जळगाव दौऱ्यावर आज आहेत. दुपारच्या सुमारास ते जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे एका विवाह समारंभाला उपस्थित राहणार आहेत. आमदार चिमणराव पाटील यांच्या कुटुंबातील हा विवाह आहे.
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. ठाकरे गटाचे आमदार किशोर दराडे यांचे चिरंजीव शुभम यांचा विवाह सोहळा त्र्यंबकरोडवरील ग्रेप काऊंटी रिसॉर्टमध्ये होत आहे. याच सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी शिंदे येणार आहेत. ठाकरे गटाच्या आमदाराच्या घरी असलेल्या विवाह सोहळ्याला शिंदे उपस्थित राहत असल्यानेही राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
– विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे नॉटरिचेबल असल्याचे बोलले जात आहे. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उपाध्यक्ष झिरवाळ यांच्याकडे सोपविला जाण्याची शक्यता आहे. काल सायंकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. मात्र, आज सकाळपासून झिरवाळ हे नॉटरिचेबल असल्याचे सांगितले जात आहे.
– नेटवर्क नसल्याने फोन लागत नव्हता असे नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले आहे. नरहरी झिरवाळ संपर्कात नसल्याने चर्चा सुरू होत्या. ‘शिंदे-फडणवीस सरकार कोसळणारच आहे, असा भक्कम दावा झिरवाळ यांनी पुन्हा एकदा केला आहे.
– ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे सुद्धा आज नाशिक दौऱ्यावर येत आहेत. हे दोन्ही नेते दराडे यांच्याकडे असलेल्या विवाह समारंभाला उपस्थित राहणार आहेत. राऊत हे दुपारी तर दानवे हे रात्रीच्यावेळी विवाहाला हजेरी लावणार आहेत.
– राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस… IL&FC कंपनी प्रकरणात सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
? *महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष प्रकरणी काय निकाल लागणार?*
या आहेत ४ शक्यता
https://t.co/FBumRbkcDR #indiadarpanlive #maharashtra #political #crisis #supreme #court #order #possibilities— India Darpan Live (@IndiaDarpanLive) May 9, 2023
(आणखी ताजे अपडेटस जाणून घेण्यासाठी या पेजला रिफ्रेश करावे)
Maharashtra Todays Political Happenings