मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मुख्य सचिव मनोज कुमार सौनिक, सर्व विभागांचे मंत्री, प्रधान सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
याअंतर्गत राज्यभरातली प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयं, स्त्री रुग्णालयं, जिल्हा सामान्य रुग्णालयं, उपजिल्हा रुग्णालयं, संदर्भ सेवा रुग्णालयं, तसंच, कॅन्सर रुग्णालयांमध्ये मोफत उपचार दिले जाणार आहेत. राज्यभरात सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत येत असलेल्या एकूण २ हजार ४१८ आरोग्यविषयक संस्था आहेत. या रुग्णालयांमध्ये वर्षभरात सुमारे अडीच कोटीपेक्षा जास्त नागरिक उपचारासाठी येत असतात. या सर्वांना राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ होणार आहे.
maharashtra state cabinet decision free of cost treatment
medical health hospitals government phc clinics