महाराष्ट्रात परतीचा पाऊस या तारखेपासून सुरू होणार…
सप्टेंबर महिना संपत असल्याने सर्वांच्या नजरा आता परतीच्या पावसाकडे आहेत. राज्याच्या काही भागात मुसळधार बरसणाऱ्या पावसाने काही भागात मात्र ओढ दिली आहे. त्यामुळे यंदा समाधानकारक चित्र नाही. आता परतीच्या पावसाचा महाराष्ट्रासाठी अंदाज काय आहे हे जाणून घेऊया…
२५ सप्टेंबर ला नैरूक्त मान्सून खालील अटी दर्शवून राजस्थानातून परत फिरला आहे.
i) जमिनीवर दीड किमी पर्यन्त प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांची स्थिती
ii) गेले ५ दिवस विभागात नसलेला पाऊस
iii)उपग्रह चित्रातून विभागात दिसणारा आर्द्रता अभाव.
महाराष्ट्रातून गुरुवार दि.५ ऑक्टोबर ला मान्सून परत फिरण्यास सुरवात होवु शकते.
दक्षिण छत्तीसगडमधील बस्तर, दांतेवाडा पासून महाराष्ट्रातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी राजापूर पर्यन्तची साडेचार किमी उंचीवर असलेल्या १२०० मीटरच्या हवेच्या कमी दाबाच्या घळीचा परिणाम हवामानावर होणार आहे. त्यामुळे आजपासून पुढील ४ दिवस म्हणजे गुरुवार दि.२८ सप्टेंबर पर्यन्त विदर्भ वगळता मुंबईसह संपूर्ण २५ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या आजपासुन पडणारा पाऊस हा रब्बी हंगामातील दुसऱ्या आवर्तनाचा पाऊस समजावा.
इतकेच !
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५