मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात. काळानुसार या परीक्षांमध्ये बदल होण्याची मागणी केली जाते. त्यानुसार आयोगाने आता मोठा निर्णय घेतला आहे. आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक पद भरतीकरिता हा बदल असणार आहे, मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धती स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. यापूर्वी ही चाचणी टाईपरायटरवर केली जात होती. मात्र, आता संगणक युगात टाईपरायटरची परीक्षा कितपत व्यवहार्य आहे, असा प्रश्न उपस्थि केला जात होता. टाईपरायटर आता कालबाह्य झाले असून त्याची जागा संगणकाने घेतली आहे. त्यामुळे आयोगाच्या परीक्षेवेळी परीक्षार्थांनी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. अखेर आयोगाने त्याची दखल घेत बदलाचा निर्णय जाहीर केला आहे.
#MPSC आयोगामार्फत आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक पद भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय. ही चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धती स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. pic.twitter.com/gF0LJmgaZH
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) October 23, 2021