रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सोडून गेलेल्यांना परत पक्षात घेणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगून टाकलं…

by India Darpan
सप्टेंबर 11, 2023 | 1:03 pm
in मुख्य बातमी
0
Sharad Pawar

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भूमिका कायम राजकीय संभ्रम निर्माण करणारी राहिली आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षावर टीका करायची आणि दुसरीकडे त्याच पक्षातील नेत्यांच्या कामाचे कौतुक करायचे. आता तर त्यांच्याच पक्षात फूट पडल्यामुळे रोज नवीन विधाने पुढे येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून अजित पवार भाजपसोबत सत्तेत सामील झाले. आता त्रिशंकू सरकार राज्यात आहे. पण जाताना पक्षाचे नाव, चिन्ह आणि शरद पवार यांचा फोटोही ते घेऊन गेलेत. नऊ मंत्र्यांसह चाळीस आमदार शरद पवारांची साथ सोडून गेले. त्यानंतर आतापर्यंत शरद पवारांच्या भूमिका कायम बदलत राहिल्या. त्यांनी कधी अजित पवार यांच्यावर टीका केली, तर कधी पक्षात फूट नसल्याचे सांगितले. एकीकडे न्यायालयात जाऊ म्हणाले आणि त्याचवेळी अजितदादांसोबत गुप्त बैठका घेतल्या. त्यामुळे सर्वाधिक संभ्रम कुणात निर्माण झाला असेल तर तो महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये. मात्र आता त्यांनी जे विधान केले आहे, ती आतापर्यंतची सर्वांत आक्रमक भूमिका मानली जात आहे. कारण माझी साथ सोडून गेलेल्या लोकांसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसची दारे कायमची बंद आहेत, अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला असेल. ‘जे गेलेत त्यांच्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसची दारे बंद झाली आहेत’, असे शरद पवार म्हणाले आहे. मुंबईत राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

कामाला लागा
या बैठकीला राज्यभरातील आमदार, खासदार व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी काहींनी जुने लोक परत आले तर काय करायचे, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर ‘हे आता डोक्यातून काढून टाका, तुम्ही फक्त कामाला लागा. महाविकास आघाडीत आपल्या वाट्याला येणाऱ्या ७०-८० जागांवर विजय मिळविण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करा,’ असा सल्ला शरद पवारांनी दिला.

इतका अट्टाहास का
जी२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत असा उल्लेख केला. राष्ट्रपतींच्या पत्रावरही इंडिया ऐवजी भारत असाच उल्लेख आहे. नाव बदलण्याचा इतका अट्टाहास का, असा सवाल शरद पवार यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आजी- माजी खासदार, आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटल सेलच्या सर्व राज्यप्रमुखांची आणि सर्व जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक पार पडली.… pic.twitter.com/Eu745oBitD

— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) September 10, 2023

Maharashtra Politics NCP Sharad Pawar on Rebel Leaders

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अजितदादांनी ‘काढला’ सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार!

Next Post

चीनला जमलं नाही ते भारत करुन दाखवणार… जी२०मध्ये या प्रस्तावाला चालना… भारताला असा होणार फायदाच फायदा

Next Post
F5pyX8ua4AAoHu2

चीनला जमलं नाही ते भारत करुन दाखवणार... जी२०मध्ये या प्रस्तावाला चालना... भारताला असा होणार फायदाच फायदा

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011