मंगळवार, मे 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयात आज काय झालं? सरन्यायाधीश काय म्हणाले?

by India Darpan
फेब्रुवारी 23, 2023 | 9:08 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
SC2B1

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राच्या राज्यपालांची कृती घटनाबाह्य असल्याचा युक्तिवाद आज ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला. ठाकरे गटातर्फे कपिल सिब्बल आणि मनु सिंघवी या ज्येष्ठ वकिलांनी सलग तिसऱ्या दिवशी जोरदार युक्तिवाद करून ठाकरे गटाची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला.

सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाकडे देण्याचा निर्णय निवडणुक आयोगाने दिला असला तरीही अद्याप सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे. त्यावरच ही सुनावणी सुरू आहे. राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीअंतर्गत अध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भात निर्णय घ्यायचा असतो. पण राज्यपालांना शिवसेना कोणती हे ठरविण्याचा अधिकार नाही. ते निवडणुक आयोग ठरवत असतं. तर मग राज्यपालांनी शिंदेंना कोणत्या अधिकारात शपथ दिली, असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केला. याचवेळी राज्यपालांचे अधिकारही ठरवावे लागतील, असेही ते म्हणाले. आसाममधून प्रोतदची निवड होण्यावरही त्यांनी आक्षेप घेतला. तसेच ठाकरे गटाच्या आमदारांना दिलेल्या नोटिशी रद्द करण्याची मागणीही न्यायालयात केली.

राज्यपालांचे लागेबांधे
सर्वोच्च न्यायालयाच्या दोन निकालांमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं, असे थेट नमूद करताना मनु सिंघवी यांनी राज्यपालांचेही राजकीय लागेबांधे असतात, असे विधान युक्तिवाद करताना केले. या प्रकरणातील युक्तिवाद आता पुढील आठवड्यात होणार आहे.

राज्यपालांना सरकार पाडता येत नाही
एखाद्या सरकारविरोधात अविश्वास ठराव संमत झाला तर सरकार पडतं. मग राज्यपालांचे अधिकार वापरले जाऊ शकतात. मात्र राज्यपालांना सरकार पाडता येणार नाही. एकनाथ शिंदे आणि भाजप राज्यपालांकडे गेले तेव्हा राज्यपालांनी महाविकास आघाडीला विश्वासदर्शक ठराव मांडण्यास सांगितलं. त्यांचा यात अधिकार काय? असा सवाल करत राज्यपालांनी घटनात्मक नैतिकता पाळायला हवी होती, असे देखील सिब्बल म्हणाले.

Maharashtra Political Crisis Supreme Court Hearing

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काँग्रेस नेत्याला सिनेस्टाईल अटक! विमान थांबवून प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाठवले, सगळाच हायव्होल्टेज ड्रामा

Next Post

‘मी जिंकेन किंवा हरेन!’ वकील कपिल सिब्बल घटनापीठाला असे का म्हणाले?

Next Post
kapil sibal

'मी जिंकेन किंवा हरेन!' वकील कपिल सिब्बल घटनापीठाला असे का म्हणाले?

ताज्या बातम्या

2 6 1024x711 1

सहकार कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी समितीची स्थापना होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मे 13, 2025
cricket

नाशिकमध्ये पावसामुळे अनिर्णित ठरलेल्या या सामन्यात अक्षत भांडारकरचे लागोपाठ दुसरे शतक…

मे 13, 2025
rain1

महाराष्ट्रात पुढील १५ ते २० दिवस अवकाळीचे वातावरण…बघा, हवामानतज्ञाचा अंदाज

मे 13, 2025
crime 13

इलेक्ट्रीक शॉक लागल्याने ३३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

मे 13, 2025
crime 88

नाशिकमध्ये दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे केले लंपास

मे 13, 2025
NEW LOGO 11 1

आज राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल…या नऊ अधिकृत संकेतस्थळाला द्या भेट

मे 13, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011