नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. गेल्या आठवड्यात ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. नंतर शिंदे गटाकडून नीरज कौल यांनी युक्तिवाद केला आणि आज मनिंदर सिंग पहिल्या तासात युक्तिवाद करणार होते. मात्र, हरीश साळवेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सरप्राईज एन्ट्री घेतली आणि दोन तासाच्या युक्तिवादाने ठाकरे गटाचे टेंशन वाढवले.
गुरुवारी सकाळी मनिंदर सिंग यांच्या युक्तिवादाने सुरुवात होणार होती. त्यानंतर मध्यंतरापूर्वी हरीश साळवेंचा युक्तिवाद होणार होता. पण पहिल्याच तासाला हरीश साळवेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती लावली आणि प्रकरण ताब्यात घेतले. युक्तिवाद सुरू केल्यापासून त्यांनी विविध प्रश्न न्यायालयात उपस्थित केले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्यपालांची नियुक्ती गणिती आकडेमोड करण्यासाठी झालेली नसते, असा मुद्दा त्यांनी न्यायालयात उपस्थित केला. राज्यपालांना बहुमताची गणिती आकडेमोड करण्यासाठी पदावर बसवलं जात नाही. ते बहुमत चाचणी बोलावू शकतात. पण ते स्वतः आमदारांची डोकी मोजू शकत नाही. कपिल सिब्बल आणि सिंघवी मात्र न्यायालयालाच आमदारांची आकडेमोड करायला सांगत आहेत, असे साळवे म्हणाले.
हे तर धोकादायक
राज्यपालांनी बहूमत चाचणीच्या शुभेच्छा दिल्या, त्या नियमाला धरून होत्या. तेव्हाच्या परिस्थितीत जे करायला हवं होतं तेच त्यांनी केलं. पण राज्यपाल जे करू शकत नाहीत, ते न्यायव्यवस्थेला करायला सांगितले जात आहे. हे अत्यंत धोकादायक आहे, याकडे हरीश साळवेंनी लक्ष वेधलं.
न्यायालयाला मध्ये का खेचता?
आम्हाला पाठिंबा द्यायचा नाही, असे युतीचे भागिदार का म्हणू शकले नाहीत? हे राजकारण आहे. यात न्यायालयाला मध्ये का खेचता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राजकारणात वेगाने वाहणारी पाणी वेळोवेळी वळण घेत असतं. प्रत्येकवेळी त्याचा अंदाज लावता येत नाही. त्यामुळे मुद्दा इथेच संपतो, असेही साळवे म्हणाले.
ठाकरे निवडून आले असते तर…
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवली असती आणि ते सभागृहात निवडून आलेले सदस्य असते तर चित्र वेगळे राहिले असते. न्यायालयाला नियमाच्या अधीन राहून या प्रकरणात लक्ष घालता आलं असतं, असं म्हणत हरीश साळवेंनी वेगळाच मुद्दा न्यायालयात उपस्थित केला आणि साऱ्यांचं लक्ष वेधलं.
https://twitter.com/_prashantkadam/status/1631195423493992448?s=20
Maharashtra Political Crisis Harish Salawe SC Hearing Entry