बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अजित पवार गटापुढे मोठे संकट? शरद पवारांनी खेळला हा मोठा डाव…

by India Darpan
सप्टेंबर 9, 2023 | 5:41 am
in इतर
0
ajit sharad pawar

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सातत्याने दोन्ही बाजुंनी एकमेकांवर आरोप होत आहेत. पण त्याचवेळी आमच्यात फुट पडलेली नाही, असा दावा शरद पवार यांनी केला होता. पण आता शरद पवार गटाकडून अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची कोंडी करण्याची पूर्ण तयारी झालेली आहे.

शरद पवार यांनी या बंडाला जनतेच्या न्यायालयात घेऊन जाणार, असे म्हटले होते. पण आता प्रत्यक्षात त्यांच्याकडून सुरू असलेल्या हालचाली या कायदेशीर कारवाईच्या दिशेने संकेत देत आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सातत्याने होत असलेल्या भेटी, त्यानंतर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्याकडून कुटुंब एक असल्याचा होत असलेला दावा यामुळे अनेक वेगवेगळे अंदाज लावले जात होते. त्यातही शरद पवार लवकरच भाजपसोबत असल्याची घोषणा करणार असल्याचेही बोलले जात होते. पण आता शरद पवार गट अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या सर्व आमदारांना कोंडीत पकडण्यासाठी सज्ज असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे. निवडणुक आयोगाला पक्षात फुट पडल्याची कबुली दिल्यानंतर शरद पवार गटाने ही तयारी केली आहे. मात्र अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी आम्ही सर्व कायदेशीर बाबी तपासूनच भाजपसोबत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्ट केले.

आमदारकी रद्द होणार?
अजित पवार यांच्यासह ९ मंत्री आणि इतर ३१ आमदार अशा एकूण ४० जणांवर आमदारकी रद्द होण्याचे संकट आहे. शरद पवार गटाने याचिका दाखल केल्यास या ४० जणांची आमदारकीला आव्हान मिळू शकते. पण हे सारे पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत लांबले जाणार, असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ब्रेकिंग

निवडणूक आयोगात शरद पवार गटाचे उत्तर दाखल, अजित पवार गटाचे सगळे दावे फेटाळले

मंत्र्यांशिवाय अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या विरोधात सुद्धा अपात्रतेची याचिका दाखल

नऊ मंत्र्यांच्या शिवाय 31 आमदारांच्या विरोधातही अपात्रतेची याचिका दाखल

यातले 4 विधान परिषद…

— Prashant Kadam (@_prashantkadam) September 8, 2023
Maharashtra NCP Ajit Pawar Trouble Politics Sharad Pawar
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

हिमाचल प्रदेशातील ढगफुटीबाबत आयआयटीच्या संचालकाचा खळबळजनक दावा… व्हिडिओ व्हायरल

Next Post

…म्हणून मोदी सरकारने बोलवले संसदेचे विशेष अधिवेशन (व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Narendra Modi 1

...म्हणून मोदी सरकारने बोलवले संसदेचे विशेष अधिवेशन (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011