मुंबई – राज्यभरात एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारल्याने त्याची दखल आता राजकीय पक्षांना घ्यावी लागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यात इशारा देण्यात आला होता की, एसटी कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नये. त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा असंतोषाचा भडका उडेल. आता राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्याने मनसेने या संपाला ठोस पाठिंबा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी मनसे असून आम्ही त्यांच्या आदोलनात सहभागी होत असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. यासंदर्भात मनसेने एक पत्रकही प्रसिद्ध केले आहे. एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे, अशी मागणीही मनसेने केले आहे. मनसेचे प्रसिद्धीपत्रक असे