India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

ऐतिहासिक! आता मुख्यमंत्री, मंत्री आणि IAS अधिकाऱ्यांचीही करता येणार तक्रार; लोकायुक्त विधेयक एकमताने मंजूर

India Darpan by India Darpan
December 28, 2022
in मुख्य बातमी
0

 

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – “महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२” हे नवीन लोकायुक्त विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. हे विधेयक आणल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तर एकमताने मंजूर केल्याबद्दल सभागृहाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले.

उपमुख्यमंत्री म्हणाले, “केंद्र सरकारने लोकपाल कायदा तयार केल्यानंतर विविध राज्यांनी लोकायुक्त कायदा तयार करणे अपेक्षित होते. या विधेयकासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना आश्वासित केल्याप्रमाणे आणि अण्णा हजारे यांना विश्वासात घेऊन हे विधेयक तयार करण्यात आले आहे. यासाठी समिती तयार करण्यात आली होती. हे विधेयक परिपूर्ण व्हावे यासाठी अण्णा हजारे आणि तज्ज्ञ समितीने सुचविलेल्या सर्व शिफारशी मान्य करण्यात आल्या आहेत.”

“राज्याचा लोकायुक्ताचा यापूर्वीचा कायदा हा सन 1971 चा आहे. आताच्या आणि आधीच्या कायद्यात महत्त्वाचा फरक हा आहे की, त्या कायद्याच्या अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम समाविष्ट नव्हता. त्यामुळे विशेष प्रकरण म्हणून चौकशी करता यायची, मात्र आता हा कायदादेखील लोकायुक्तामध्ये आला आहे. यापूर्वीच्या कायद्यात मंत्री अथवा मुख्यमंत्री यांचा समावेश नव्हता. एखाद्या मंत्र्यावर तक्रार झाली तर विशेष प्रकरण (स्पेशल केस) म्हणून पडताळणी करा, असे राज्यपाल सांगू शकत होते. यात केवळ शिफारस करण्याचे अधिकार होते. मात्र आता भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याला लोकयुक्ताच्या कक्षेत आणले आहे. या कायद्यामुळे आता मुख्यमंत्री, मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांनाही लोकायुक्ताच्या अंतर्गत आहे. एखादी भ्रष्टाचाराची घटना घडल्यास आता लोकायुक्त त्यावर थेट कारवाई करू शकणार आहेत.”

On #LokayuktaBill in Maharashtra Legislative Assembly..
लोकायुक्त कायद्याबाबत विधानसभेत….
(विधानसभा । दि. 28 डिसेंबर 2022)#WinterSession #Maharashtra #Lokayukt pic.twitter.com/ALdkQL8Ksu

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 28, 2022

“हे करत असताना या कायद्याचा गैरवापर होऊ नये, खोट्या तक्रारी होऊ नयेत यासाठी काही निकष ठेवले आहेत. केंद्रीय लोकायुक्त कायद्याप्रमाणेच निकष ठरवले आहेत. आमदारांच्या संदर्भात अध्यक्षांना आणि मंत्र्यांच्या संदर्भात राज्यपालांना अधिकार देण्यात आले आहेत. या चाळणीतून गेल्याशिवाय ही तक्रार दाखल होणार नाही. योग्य तक्रार असेल तर ती दाखल करुन घ्यावीच लागेल आणि खोट्या तक्रारी आसतील तर त्या दाखल करून घेता येणार नाहीत, अशा तरतुदी ठेवण्यात आल्या आहेत.”

“सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश यांना लोकायुक्त म्हणता येणार आहे. त्यांच्या अंतर्गत काही पदे असतील. केंद्रीय कायद्यानुसार जसे लोकपाल हे एक पॅनेल आहे तसेच हे लोकायुक्तांचे पॅनेल तयार करण्यात येणार आहे. या पॅनेलला दोन जणांच्या बेंचने काम करण्याचे अधिकार देण्यात आले आहे.”
“आज हे एक ऐतिहासिक विधेयक पारित होत आहे. या विधेयकामुळे पारदर्शकपणे काम करण्याचे आपल्या सर्वांवर बंधन येणार आहे. लोकपाल कायद्यासारखे लोकायुक्त हे विधेयक इथे मंजूर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे”, असेही श्री फडणवीस म्हणाले.”

Maharashtra Lokayukta Bill Passed in Assembly
Winter Session Nagpur Historic


Previous Post

वंजारी सेवा संघाचा १ जानेवारीला रत्नागिरीला दशकपूर्ती व राज्यस्तरीय मेळावा

Next Post

भाजप नेते मुकेश शहाणे, विक्रम नागरेंवर गुन्हा दाखल; हे आहे प्रकरण

Next Post

भाजप नेते मुकेश शहाणे, विक्रम नागरेंवर गुन्हा दाखल; हे आहे प्रकरण

ताज्या बातम्या

चित्रपट शुटींगवेळी अभिनेता अक्षय कुमार जखमी

March 24, 2023

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; आता हा सुद्धा गुन्हा मानला जाणार

March 24, 2023

येत्या १ एप्रिलपासून बदलणार हे सर्व नियम… आजच घ्या जाणून… अन्यथा…

March 24, 2023

करौली बाबाच्या अनेक बाबी उघड… दररोज करोडोंची उलाढाल.. आश्रमात आहेत या शाही सुविधा… अॅम्ब्युलन्सचा यासाठी होतो वापर…

March 24, 2023

पुणेरी जाऊ द्या… आता या सोलापुरी बॅनरची जोरदार चर्चा… असं काय आहे त्यात? तुम्हीच बघा

March 24, 2023

बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी… येथे निघाल्या तब्बल ५३६९ जागा… येथे आणि असा करा अर्ज

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group