बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ग्रामस्थ कुणाच्या बाजूने? त्यांचे काय म्हणणे आहे? घ्या जाणून सविस्तर…

by India Darpan
नोव्हेंबर 26, 2022 | 12:35 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
maharashtra karnatak border

 

कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सीमावर्ती भागातील गावांचा पाणीप्रश्न सातत्याने दुर्लक्षित केल्याने राज्य सरकारची डोकेदुखी आता वाढली आहे. बेळगाव, निपाणी, भालकी येथील मराठी भाषिकांची कर्नाटक सरकार गळचेपी करत आहे. पण राज्यातील सीमावर्ती भागातील गावांची परिस्थिती त्याहूनही बिकट असल्याचे या सीमावादावरुन समोर आले आहे. आता या परिस्थितीचा ग्रामस्थांकडून मात्र फायदा घेतला जात आहे.

पाणी आणि इतर मुलभूत सुविधांसाठी अद्यापही या भागातील लोकांना संघर्ष करावा लागत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या भांडणात फायदा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव आणण्यात येत आहे. आता या मोक्यावर गावकऱ्यांनी चौका मारला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील अनेक गावे कर्नाटकात येण्यास इच्छुक असल्याचा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केला. त्यावरुन टिकेची झोड उठवली.

राज्यकर्ते आणि विरोधकांनी बोम्माई यांच्यावर तोंडसूख घेतले. पण मुळ पाणी प्रश्नाचा मुद्दा उपस्थित होताच, सीमावर्ती गावांनी राज्य सरकारच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली आहे. आता तर जत तालुक्यातील ४० गावांनी पाणी पुरवठा न केल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे. सीमावर्ती भागातील गावांमधील सोयी-सुविधांबाबत सरकारची उदासीनताही यामुळे उघड झाली आहे. पाणी प्रश्न एका आठवड्यात सोडविण्याचा अल्टिमेटम या गावांनी दिला आहे. जत तालुका पाणी कृती समितीने पाण्यासाठी एल्गार पुकारला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी दोन दिवसांपूर्वी सीमावर्ती भागातील कन्नड शाळांना विशेष अनुदान देण्याचीही घोषणा केली होती. एवढेच नाहीतर ज्या कन्नड भाषिकांनी गोवा मुक्तीसाठी, स्वातंत्र्य लढ्यासाठी आणि एकीकरण चळवळीसाठी योगदान दिले, त्यांना पेन्शन लागू करण्याची घोषणा केली. महाराष्ट्राच्या हद्दीतील कर्नाटक सरकारच्या या खोडसाळपणामुळे राज्य सरकारसह विरोधकही खडबडून जागे झाले. मात्र तरीदेखील बोम्मई यांनी जत तालुक्यावर, अक्कलकोटसह सोलापूरवर हक्क सांगितला आहे. कर्नाटक सरकारने दावा सांगितल्यानंतर जो मदत करेल, पाणी प्रश्न सोडवेल, त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय जत तालुक्यातील पाणी कृती समितीने घेतला आहे. पाण्याचा प्रश्न तातडीने न सोडविल्यास थेट कर्नाटकात सामील होण्याचा इशाराच समितीकडून राज्य सरकारला देण्यात आला आहे.

Maharashtra Karnataka Border Village Issue Citizen Opinion
Dispute Controversy

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शाही विवाह सोहळा… २ लाख लग्नपत्रिका… हजारो चौफुट शामियाना… एकावेळी ५ हजारांची पंगत… आणि बरंच काही…

Next Post

नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणासाठी या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

India Darpan

Next Post
UPSC

नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणासाठी या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011