इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद आता आणखी पेटला आहे. कारण, कर्नाटकात आज हिंसक आंदोलन छेडण्यात आले. कर्नाटक रक्षण वैदिक संघटनेने बेळगावमध्ये हिंसक निदर्शने केली. आंदोलकांनी महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक केली. या आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवारेही सोडले.
कर्नाटक रक्षण वैदिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावी येथील बेगवाडी येथे हिंसक आंदोलन केले. महाराष्ट्रातून आलेल्या ट्रकवर दगडफेक केली. यावेळी कर्नाटक रक्षण वैदिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या कर्नाटक पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेची दखल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यांनी तातडीने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी संवाद साधला. बेळगावजवळील बेगेवाडी येथील घटनांबाबत फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन बोम्मई यांनी दिले आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांचे संरक्षण केले जाईल, असे आश्वासन त्यांनी फडणवीस यांना दिले आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1600055644278902790?s=20&t=d6KWqT8GbBuboulUI_DFsw
सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की त्यांनी आपला प्रवास पुढे ढकलला आहे, तो रद्द केलेला नाही. देसाई म्हणाले की, आज आम्हाला बेळगावी सीमाभागात जायचे होते, त्याबाबत आम्ही कर्नाटक सरकारला कळवले होते. सीमाप्रश्नावर लोकांशी चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जेणेकरून या प्रकरणावर शांततापूर्ण तोडगा काढता येईल.
दरम्यान, महाराष्ट्राचे मंत्री बेळगावी दौऱ्यावर जात असल्याबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्षेप घेतला होता. सीमेवरील दोन राज्यांमधील सध्याची परिस्थिती पाहता बेळगावला भेट देऊ नये, त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते, असे ते म्हणाले होते.
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1600077901361127430?s=20&t=_2duIvGV9jIB-L-qAEkDWw
बेळगाव हे सध्या कर्नाटक राज्याचा भाग आहे, पण ते महाराष्ट्रात हवे, अशी अनेक दशकांची मागणी आहे. दरम्यान, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद वाढल्याने सीमा भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
https://twitter.com/ANI/status/1600054868453994497?s=20&t=VELeHZeJbxhdmG14glJzDA
Maharashtra Karnataka Border Issue Stone Pelting in Belagavi