नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज अनोखे आंदोलन करण्यात आले. नवीन घंटागाडीची उंची व कचरा संकलन करण्याकरिता कर्मचारी नेमण्याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक महानगरपालिकेवर कचरा फेकत तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त अशोक अत्राम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश पदाधिकारी अर्जुन टिळे, कोंडाजी आव्हाड, संजय खैरनार, अंबादास खैरे, अनिता भामरे, धनंजय निकाळे आदि जेष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने विविध भागात नवीन घंटागाडीची निविदा प्रक्रिया राबवत ठेका देण्यात आला आहे. परंतु नवीन घंटागाडीमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असल्याचे निदर्शनास येत आहे. नविन घंटागाडीची उंची जास्त असून नागरिकांचा हात घंटागाडी पर्यंत पोहोचत नसल्याने त्यांना गाडीमध्ये कचरा टाकता येत नाही. त्यामुळे कचरा उडून त्यांच्याच अंगावर पडत आहे. घंटागाडीमध्ये कचरा टाकण्याकरिता नागरिकांना खुर्चीच्या सहाय्याने अथवा विविध प्रकारची शक्कल लढवून कचरा टाकावा लागत आहे. नवीन घंटागाडीचा आकार व क्षमता खूपच कमी असल्याने मोजक्या ठिकाणी पोहचेपर्यंतच सदरची गाडी कचऱ्याने भरते. व सदर घंटागाडीतील कचरा रिकामा करण्याचा कालावधी जास्त असल्याने नागरिकांना आपला बराचसा वेळ खर्ची करावा लागत आहे. तसेच जुनी घंटागाडीची उंची जास्त होती परंतु कचरा संकलन करण्याकरिता कर्मचाऱ्यांची नेमणूक मक्तेदाराने केली होती. हीच पद्धत सुरु ठेण्यात यावी अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्तांना भेट देण्यासाठीचा कचरा सुरक्षा रक्षकांनी अडवला. “नही चलेगी, नही चलेगी तानाशाही नही चलेगी”, “प्रशासनाचा धिक्कार असो”, “घंटागाडीची उंची कमी झाली पाहिजे” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी डॉ.अमोल वाजे, माजी नगरसेविका सुषमा पगारे, जगदीश पवार, बाळासाहेब मते, किशोर शिरसाठ, सुरेखा निमसे, शंकर मोकळ, मनोहर कोरडे, कुणाल बोरसे, नदीम शेख, शशिकांत पवार, योगेश दिवे, राजेंद्र शेळके, गौतम पगारे, नियामत शेख, साजिद मुलतानी, नाना पवार, डॉ.संदीप चव्हाण, संजय पगारे, डॉ.युवराज मुठाळ, विलास वाघ, प्रा.हेमंत कांबळे, योगेश निसाळ, मोतीराम पिंगळे, पंडित खाडे, नितीन कदम, अमोल नाईक, सुनिल घुगे, संतोष भुजबळ, रविंद्र शिंदे, युवराज नाईक, ज्ञानेश्वर महाजन, योगिता पाटील, गणेश पवार, मुकेश शेवाळे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.