रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

महाराष्ट्रातील ही वारसास्थळे पर्यटकांसाठी होणार खुली; इस्राईल सोबत सामंजस्य करार

डिसेंबर 16, 2022 | 5:34 am
in राज्य
0
140x570 2

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील ज्यू वारसास्थळे पर्यटनाच्या नकाशावर यावीत यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि मुंबई येथील इस्राईलचे महावाणिज्यदूत यांच्यासोबत या स्थळांच्या पर्यटनाबाबतच्या इरादा पत्रावर पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे मुंबई, ठाणे यांसह राज्यातील महत्वाची ज्यू -वारसास्थळांची जगभरातील पर्यटकांना ओळख होईल, असा विश्वास पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.

आज मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात, मुंबईतील इस्राइलचे महावाणिज्यदूत कोबी शोशनी, पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, इस्राइलचे राजकीय दूत अनय जोगळेकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री.लोढा म्हणाले, राज्यात अनेक शतकांपासून ज्यू लोकांचे वास्तव्य आहे. त्यांनी मराठी भाषा, संस्कृती आणि चालीरिती स्वीकारल्या आहेत. जगभरातील अनेक इस्रायली आणि ज्यू लोक पर्यटनासाठी मुंबईला भेट देतात आणि त्यांना त्यांच्या वडिलोपार्जित स्थळांना भेट देण्याची इच्छा असते. या उपक्रमाची माहिती राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावी तसेच यासाठी सर्व परवानग्या देण्यासाठी शासन सहकार्य करेल, या सहकार्यामुळे ज्यू वारसा जपला जाईल आणि महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील पर्यटनाला चालना मिळेल
पर्यटन सचिव सौरभ विजय म्हणाले, इरादा पत्रावर झालेल्या स्वाक्षरीमुळे राज्यातील विविध ज्यू वारसा स्थळांचा विकास करणे शक्य होणार आहे. लवकरच इस्राईलचे महावाणिज्यदूत आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत जेविश पर्यटन सुरु करण्यात येईल. मुंबई आणि ठाणे येथील सिनेगॉग आणि सिमेट्रिज तसेच पनवेल, पुणे आणि अलिबाग येथील ज्यू वारसा स्थळांचा यामध्ये समावेश करण्यात येईल.

इस्रायलमध्ये भारतीय पर्यटन सर्किट विकसित करणार
कॉन्सुल जनरल कोब्बी शोशानी म्हणाले की, इस्रायलमध्ये भारतीय ज्यू समुदायांबद्दल आणि महाराष्ट्राच्या समकालीन इतिहासातील त्यांच्या योगदानाबद्दल जगभरातील ज्यूंमध्ये जागरूकता वाढवण्यास यामुळे मदत होईल. इस्रायलमध्ये भारतीय पर्यटन सर्किट विकसित करण्यासाठी असाच प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी, कृपया मुंबईतील इस्रायलच्या महावाणिज्य दूतावासातील अनय जोगळेकर यांच्याशी ९७६९४७४६४५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

पर्यटन पॅकेज बाबत माहिती देणार
एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी म्हणाल्या की, या इरादा पत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर, मुंबईतील इस्रायलच्या महावाणिज्य दूतावासाच्या मदतीने स्थानिक ज्यू समुदाय आणि ज्यू स्मारकांमध्ये त्यांच्या इतिहासाची आणि महत्त्वाची माहिती देणारे फलक लावून एमटीडीसी एक ते तीन दिवसांच्या प्रवासाचे अनेक कार्यक्रम तयार करणार आहे. तसेच टूर गाइड आणि हॉटेल्स इत्यादींसह पॅकेज म्हणून ऑफर देखील तयार करण्यात येतील.

Maharashtra Heritage Places Tourism Israel MOU

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य सरकारच्या या योजनेद्वारे तुम्हाला मिळेल तब्बल १ लाखाचे कर्ज; २० डिसेंबरपर्यंत करा अर्ज

Next Post

धक्कादायक! अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या खटल्यातील कागदपत्रे गहाळ; आता पुढे काय

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
Mamta Kulkarni

धक्कादायक! अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या खटल्यातील कागदपत्रे गहाळ; आता पुढे काय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011