इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूड हे मृगजळ आहे याचे भान कायम ठेवावे लागते. अन्यथा या क्षेत्रातून आपण कधी बाहेर फेकले जातो, हे तुम्हालाच कळत नाही. बॉलीवूडमध्ये रातोरात नाव कमावलेल्या मात्र त्याच वेगाने या इंडस्ट्रीमधून गायब झालेल्या अभिनेत्रींमध्ये ममता कुलकर्णी हिचे नाव अग्रस्थानी असेल. ममता कुलकर्णी ही एकेकाळी प्रसिद्ध अभिनेत्री जरी असली तरी तिच्याबाबत अनेक विवाद उपस्थित झाले झाले होते. या वादांमुळे ती कायम चर्चेत असायची. याच दरम्यान ती अमली पदार्थ तस्करी प्रकरणात अडकली.
नुकतेच अमली पदार्थ तस्करीप्रकरणी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित कागदपत्रे गहाळ झाली आहेत. ती सापडत नसल्याने याचिकेअभावी तीन वेळा सुनावणी होऊ शकली नसल्याबाबत उच्च न्यायालयाने बुधवारी नाराजी व्यक्त केली. तसेच ही कागदपत्रे सापडत नसल्यास संबंधित पक्षकारांच्या मदतीने ती पुन्हा तयार करावीत आणि पुढील सुनावणीच्या वेळी न्यायालयासमोर सादर करावीत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
२०१६ मध्ये ममता कुलकर्णी आणि तिचा नवरा विक्की गोस्वामी यांना केनिया विमानतळावर अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती. तिला चित्रपटात काम मिळावे म्हणून अंडरवर्ल्डमधून फोन यायचे असे सांगितले जाते. या प्रकरणातील सहआरोपीने दाखल याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी नकार दिला होता. ही बाब या प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी बुधवारच्या सुनावणीच्या वेळी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर न्यायमूर्ती डेरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ममता हिच्या याचिकेवर सुनावणी घेण्यापासून स्वत:ला दूर ठेवत असल्याचे स्पष्ट केले.
हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी ममताने वकील माधव थोरात यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे. न्यायमूर्ती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर बुधवारी ही याचिका तिसऱ्यांदा सुनावणीसाठी आली. त्या वेळी ममता हिने दाखल याचिकेशी संबंधित कागदपत्रे अद्यापही सापडलेली नसून त्याचा शोध सुरू असल्याचे न्यायालयाच्या निबंधक कार्यालयातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.
Bollywood Actress Mamta Kulkarni Court Case Documents Missing
Mumbai High Court Petition Legal Drugs