India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

राज्य सरकारचा गोंधळ सुरूच; या पोलिस अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्तीचे नवे आदेश

India Darpan by India Darpan
November 15, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत ईडी सरकारचा भोंगळ कारभार काही केल्या थांबण्याचे नाव दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच अपर पोलिस अधीक्षकपदी बढती देऊन नियुक्ती केलेल्या दोन अधिकाऱ्यांचे आता नव्याने नियुक्ती आदेश गृह विभागाने जारी केले आहेत.

आयपीएस असलेले निलेश तांबे यांना अपर पोलिस अधीक्षकपदी बढती देऊन त्यांची मालेगाव येथे पदस्थापना करण्यात आली होती. तर पंकज शिरसाठ यांनाही बढती देत त्यांची राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र मर्जीतल्या अधिकाऱ्यांची इच्छुक ठिकाणी नेमणूक करण्यासाठी जोर लावण्यात व्यस्त असलेल्या ‘ईडी’ सरकारचा बदल्यांमधला गोंधळ सुरूच आहे. गृह विभागाने आज पुन्हा नवा आदेश जारी केला आहे.

नव्या आदेशानुसार, निलेश तांबे यांची अपर पोलिस अधीक्षक नंदुरबार, तर पंकज शिरसाठ यांची अपर पोलीस अधीक्षक पालघर अशी नियुक्ती केली आहे. याशिवाय अनिकेत भारती यांची अपर पोलिस अधीक्षक मालेगाव येथे नियुक्ती करण्यात आली असून विजय पवार यांच्या पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार आहेत. बदलीचे आदेश जारी करून मग काही बदल्यांना स्थगिती, पुन्हा नवा बदली आदेश असा खेळच सध्या दिसून येत आहे.

Maharashtra Government Police Officers Appointment New Order


Previous Post

विनापरवाना पिस्तूल खरेदी विक्री प्रकरणात दोन जण गजाआड; कारसह २ गावठी कट्टे, जीवंत काडतुसे हस्तगत

Next Post

‘शाब्बास सूनबाई’ एका ध्येयवादी सूनेची गोष्ट; नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

Next Post

'शाब्बास सूनबाई' एका ध्येयवादी सूनेची गोष्ट; नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

ताज्या बातम्या

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… कावळ्याला एवढे महत्त्व का?

September 30, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

September 30, 2023

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group