मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत ईडी सरकारचा भोंगळ कारभार काही केल्या थांबण्याचे नाव दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच अपर पोलिस अधीक्षकपदी बढती देऊन नियुक्ती केलेल्या दोन अधिकाऱ्यांचे आता नव्याने नियुक्ती आदेश गृह विभागाने जारी केले आहेत.
आयपीएस असलेले निलेश तांबे यांना अपर पोलिस अधीक्षकपदी बढती देऊन त्यांची मालेगाव येथे पदस्थापना करण्यात आली होती. तर पंकज शिरसाठ यांनाही बढती देत त्यांची राज्य गुप्तवार्ता विभागात उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र मर्जीतल्या अधिकाऱ्यांची इच्छुक ठिकाणी नेमणूक करण्यासाठी जोर लावण्यात व्यस्त असलेल्या ‘ईडी’ सरकारचा बदल्यांमधला गोंधळ सुरूच आहे. गृह विभागाने आज पुन्हा नवा आदेश जारी केला आहे.
नव्या आदेशानुसार, निलेश तांबे यांची अपर पोलिस अधीक्षक नंदुरबार, तर पंकज शिरसाठ यांची अपर पोलीस अधीक्षक पालघर अशी नियुक्ती केली आहे. याशिवाय अनिकेत भारती यांची अपर पोलिस अधीक्षक मालेगाव येथे नियुक्ती करण्यात आली असून विजय पवार यांच्या पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार आहेत. बदलीचे आदेश जारी करून मग काही बदल्यांना स्थगिती, पुन्हा नवा बदली आदेश असा खेळच सध्या दिसून येत आहे.
Maharashtra Government Police Officers Appointment New Order