मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल सकाळी झाला. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. भाजपचे ९ तर शिंदे गटाचे ९ अशा एकूण १८ आमदारांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या मंत्र्यांचे खातेवाटप आतापर्यंत जाहीर होणे आवश्यक आहे. मुळात तब्बल ४० दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. असे असताना आता खातेवाटपही लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात भाजप आणि शिंदे गटात एकमत होत नसल्याने आगामी काही दिवस सर्वच्या सर्व १८ मंत्री हे बिनखात्याचेच म्हणून राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्याचे संभाव्य मंत्रिमंडळ आणि खातेवाटप असे
एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री – नगरविकास
देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री – गृह व अर्थ
भाजप
१. राधाकृष्ण विखे पाटील – शिर्डी, अहमदनगर – महसूल
२. सुधीर मुनगंटीवार – बल्लारपूर, चंद्रपूर – ऊर्जा, वन
३. चंद्रकांत पाटील – कोथरुड, पुणे – सार्वजनिक बांधकाम
४. विजयकुमार गावित – नंदुरबार – आदिवासी विकास
५. गिरीश महाजन – जामनेर, जळगाव – जलसंपदा
६. सुरेश खाडे – मिरज, सांगली – सामाजिक न्याय
७. रवींद्र चव्हाण – डोंबिवली, मुंबई – गृहनिर्माण
८. अतुल सावे – औरंगाबाद पूर्व – आरोग्य
९. मंगलप्रभात लोढा – मुंबई – विधी व न्याय
एकनाथ शिंदे गट
१. गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण – पाणीपुरवठा
२. दादाजी भुसे – मालेगाव बाह्य, नाशिक – कृषी
३. संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ – ग्रामविकास
४. संदीपान भुमरे – पैठण, जालना – रोजगार हमी
५. उदय सामंत – रत्नागिरी – उद्योग
६. तानाजी सावंत – परांडा, उस्मानाबाद – उच्च व तंत्रशिक्षण
७. अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद – अल्पसंख्याक विकास
८. दीपक केसरकर – सावंतवाडी, सिंधुदुर्ग – पर्यावरण, पर्यटन
९. शंभुराजे देसाई – पाटण, सातारा – उत्पादन शुल्क
Maharashtra Government Cabinet Portfolio Allocation Delayed