मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – होणार होणार असे गेल्या महिन्याभरापासून सांगितला जाणारा मंत्रिमंडळ विस्तार अखेर उद्या, मंगळवारी (९ ऑगस्ट) होणार आहे. राजभवनात सकाळी ११ वाजता शिंदे-फडणवीस सरकारचे नवे मंत्री शपथ घेणार आहेत. यांदर्भातील बोलणी आता पक्की झाली असून वरिष्ठ भाजप नेत्याने त्याबाबत माहिती दिली आहे. भाजपचे ८ ते ९ तर शिंदे गटामधील ७ ते ८ आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. भाजपकडे अपक्षांसह ११५ आमदार आहेत. शिंदे गटाकडे अपक्षांसह ५० आमदार आहेत. त्यामुळे सुरुवातीला यातील काही मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. गेल्या महिन्याभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार यातील काही नावे समोर आली आहेत.
भाजपकडून यांना संधी
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
राधाकृष्ण विखे पाटील
बबनराव लोणीकर
प्रवीण दरेकर
रविंद्र चव्हाण
नितेश राणे
शिंदे गटाकडून यांना संधी
दादा भुसे
गुलाबराव पाटील
उदय सामंत
शंभूराज देसाई
दीपक केसरकर
संदीपान भुमरे
संजय शिरसाट
अपक्ष गटाकडून यांना संधी
बच्चु कडू
रवी राणा
Maharashtra Government Cabinet Expansion Tomorrow