महाराष्ट्रासाठी असा आहे पावसाचा अंदाज
‘ मध्यम पावसाची शक्यता ‘
यंदा पाऊस महाराष्ट्रावर रुसला आहे. कारण, पडणार, आता येणार, तेव्हा येणार असे अनेक अंदाज वर्तवले गेले. पण, पावसाने मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांवर कृपा दृष्टी ठेवली. आता आगामी काही दिवसासाठी पावसाचा अंदाज आपण जाणून घेऊया…
रब्बी हंगामासाठी सर्वात महत्वाची पहिल्या आवर्तनातून महाराष्ट्रास हमखास पाऊस देणारी पूर्व-पश्चिम जाणारी कमी दाब क्षेत्र प्रणाली पूर्व म. प्रदेशातून काहीशी उत्तरेकडे सरकल्यामुळे, महाराष्ट्रातील खान्देश वगळता दि. १६ ते १९ सप्टेंबरचा ४ दिवसादरम्यानचा महाराष्ट्रासाठीचा खात्रीचा हंगाम तारून नेणारा कि ज्यावर हंगामातील शेवटच्या टप्प्यातील अपेक्षित पावसाची भिस्त होती तो पाऊस त्यामुळे हिरावला गेला, व त्याने महाराष्ट्रातील सिंचनाचे सर्व गणित चुकवले.
महाराष्ट्राऐवजी ह्या पावसामुळे मध्य प्रदेश, गुजराथ, उत्तर प्रदेश मधील धरणे ओसंडली व नद्या खळाळल्यात, आणि महाराष्ट्र कोरडाच राहिला.
आज सध्या ‘ मान्सून आस ‘ सरासरी जागेपासून दक्षिणेलाच असुन बंगालच्या उपसागरातील साडेसात किमी. उंचीचे कमी दाब क्षेत्र सध्या झारखंड व सभोंवताल परिसरात स्थित आहे .
त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीन दिवस म्हणजे दि.२१ ते २३ सप्टेंबर (गुरुवात ते शनिवार) दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची तर मुंबईसह कोकणात मात्र जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
त्यापुढील ३ दिवस म्हणजे दि. २४ ते २६ सप्टेंबर (रविवार ते मंगळवार) दरम्यान महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण व नंदुरबार धुळे जळगांव नाशिक नगर पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार तर उर्वरित महाराष्ट्रातील जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यताही जाणवते.
सध्या विशेष इतकेच!
माणिकराव खुळे,
ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्,
भारतीय हवामान खाते,
पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Maharashtra Climate Rainfall Weather Prediction