मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला. तत्पूर्वी फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. महाराजांना पुष्पहार अर्पण केला. विधानसभेत फडणवीस हे अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. जाणून घेऊया अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा आणि तरतुदी
शेतीसाठी भरीव तरतूद
नमो शेतकरी महासन्मान निधीचा दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असून महाकृषी विकास अभियान योजनेमुळे राज्यात क्रांती होणार आहे. केवळ एक रुपयात पिक विमा घेता येणार असल्याने मोठा दिलासा शेतकऱ्याला मिळणार आहे. मागेल त्याला शेततळेचा विस्तार वाढविणे असो किंवा विदर्भ, मराठवाड्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देणे असो, ५००० गावांत जलयुक्त शिवार, सिंचनाचे विविध प्रकल्प पूर्ण करणे यासाठी या अर्थसंकल्पात केलेली तरतूद निश्चितच भरीव आहे.
महिलांचे सक्षमीकरण होणार
चौथ्या सर्वसमावेशक महिला धोरणाची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय नोकरदार महिलांसाठी केंद्राच्या मदतीने ५० वसतिगृहे, निराधार व निराश्रित महिलांसाठी नवीन ५० शक्ती सदन, एसटी बस प्रवासात सरसकट ५० टक्के सूट, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ, महिला खरेदीदाराला स्टॅम्प ड्युटीमध्ये एक टक्का सवलत दिल्याने तसेच लेक लाडकी योजना पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना लागू केल्याने महिला सक्षमीकरण होणार आहे.
दुर्लक्षित घटकांना न्याय
अर्थसंकल्पात दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला आहेय धनगर समाजाला १ हजार कोटी, ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ देणे, ज्येष्ठांसाठी प्रत्येक पालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र, महात्मा जोतिराव फुले जनारोग्य योजनेत उपचाराची मर्यादा ५ लाखापर्यंत वाढविणे, निराधारांना अर्थसहाय वाढविणे, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रकल्पबाधित मासेमारांना नुकसानभरपाईसाठी धोरण राबविण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. विविध असंघटित कामगार, विविध दुर्लक्षित समाजांसाठी महामंडळे स्थापल्यामुळे ते मुख्य प्रवाहात येतील. आदिवासी आश्रमशाळांनाआदर्श बनविण्याचा निर्णयही महत्त्वाचा आहे.
सर्वांसाठी घरे
यावर्षी १० लाख घरांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आखण्यात येत असून इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्षात १० लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’ सुरु केल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर घरांचे बांधकाम होऊन हक्काचा निवारा मिळेल.
पायाभूत सुविधांनी राज्यात बदल
राज्यात महामार्गांचा विस्तार, नवीन रस्ते मेट्रो प्रकल्प, बसस्थानकांचे आधुनिकीकरण, विमानतळांचा विकास, यामुळे राज्यात बदल दिसून यायला सुरुवात होईल,असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला.
रोजगारक्षम युवा शक्ती
उद्योगांना कुशल मनुष्यबळासाठी १० उत्कृष्टता केंद्रे , आयटीआयचे आधुनिकीकरण, ७५ हजार शासकीय पद भरती, स्टार्टअपसाठी नवी मुंबईत कळंबोली येथे निवासी प्रशिक्षण संशोधन संस्था तसेच राज्यात ६ प्रमुख शहरांत सर्क्युलर इकॉनॉमी पार्क उभारणे यासारख्या योजनांमुळे विशेषत: तरुणांना लाभ होईल आणि त्यांच्या करियरला मदत होईल.
मुंबईचा सर्वांगीण विकास
मुंबईच्या सुशोभीकरणासाठी १७२९ कोटींचा खर्च अर्थसंकल्पात केल्याने मुंबईचे रूप बदलेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच हिंदुह्र्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे यांच्या स्मारकाला त्याचप्रमाणे राज्यातील इतरही स्मारकांना वाढीव निधी देऊन गती देण्यात येत आहे.
पर्यटनाला चालना
श्री क्षेत्र रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृत्यर्थ आष्टी, वर्धा येथे स्मारक, धार्मिक क्षेत्रांचा विकास यामुळे महाराष्ट्राचे वैभव वाढेल. राज्याच्या पर्यटन आराखड्यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. विकास करतांना तो पर्यावरणपूरक असेल याची देखील काळजी घेण्यात आली आहे.
विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद.. https://t.co/lAOsNJSUo8
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 9, 2023
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा आणि तरतुदी अशा
अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प.
पंचामृत ध्येयावर आधारित
१. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
२. महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
३. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
४. रोजगारनिर्मिती
५. पर्यावरणपूरक विकास
शेतकऱ्यांसाठी बंपर घोषणा
– शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना
– शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 12 हजार रुपये
– यंदाचा अर्थसंकल्प पंचामृत ध्येयावर आधारीत
– नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर
– प्रति शेतकरी, प्रति वर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
– केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना प्रतिवर्ष मिळणार
– 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
– 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाचे यंदाचे हे 350 वे वर्ष. यानिमित्त या महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद
– आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारणार. त्यासाठी 50 कोटी रुपये
– मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने उभारणार : 250 कोटी रुपये
– शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारणार. तसेच, शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन यासाठी 300 कोटी रुपये
– महिलांना राज्य परिवहन महामंडळांना बस प्रवासाच्या तिकीट दरात सरसकट 50 टक्क्यांची सूट;
– महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचारखर्च दीड लाखावरुन 5 लाख करण्यात येणार.
– राज्यभर ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ अंतर्गत 700 दवाखाने सुरु करणार.
– गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत
– गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
– आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
– धनगर समाजाला 1000 कोटी रुपये
– महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
– 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
– राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत
– चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
– महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
– कर, व्याज, शास्ती, व विलंब शुल्क थकबाकीची तडजोड योजना व्यावसायिकांना दिलासा देणारी
LIVE | Presenting #MahaBudget2023 for Maharashtra..#BudgetSession2023 #budget #Budget2023 https://t.co/q7wWowuzmX
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 9, 2023
Maharashtra Budget 2023 Live Telecast