India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

#MahaBudget2023 शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; वर्षाला मिळणार एवढे रुपये

India Darpan by India Darpan
March 9, 2023
in Short News
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करीत आहेत. तत्पूर्वी फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. महाराजांना पुष्पहार अर्पण केला. अपेक्षेप्रमाणे फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे.

अर्थमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पात दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार, फडणवीसांकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर. याअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 12 हजार रुपये मिळतील.  प्रति शेतकरी, प्रति वर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार आहे. केंद्र सरकारचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना प्रतिवर्ष मिळणार आहेत. राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे. तशी घोषणा फडणवीसांनी विधिमंडळात केली.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना !!

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12,000 रुपयांचा सन्माननिधी#MahaBudgetSession2023#MahaBudget2023 pic.twitter.com/NnPkdIcQOc

— जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग (@InfoRaigad) March 9, 2023

 

फडणवीसांची दुसरी मोठी घोषणा पीर विम्याबाबत आहे. शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना मिळणार आहे. आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून घेतली जाणार. आता शेतकर्‍यांवर पीक विम्याचा  कोणताच भार नाही. राज्य सरकार हप्ता भरणार. यासाठी राज्य सरकार 3312 कोटी रुपयांचा भार उचलणार

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्याने भरावयाची २ टक्के रक्कम आता राज्य शासन भरणार असून शेतीच्या शाश्वत विकासासाठी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी 'महाकृषी विकास योजना' जाहीर केली.#महाअर्थसंकल्प२०२३#MahaBudget2023 pic.twitter.com/tGKetTn3bW

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 9, 2023

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा आणि तरतुदी अशा
अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प.
पंचामृत
ध्येयावर आधारित
१. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
२. महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
३. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
४. रोजगारनिर्मिती
५. पर्यावरणपूरक विकास

– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाचे यंदाचे हे 350 वे वर्ष. यानिमित्त या महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद
– आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारणार. त्यासाठी 50 कोटी रुपये
– मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने उभारणार : 250 कोटी रुपये
– शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारणार. तसेच, शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन यासाठी 300 कोटी रुपये

– महिलांना राज्य परिवहन महामंडळांना बस प्रवासाच्या तिकीट दरात सरसकट 50 टक्क्यांची सूट;
– महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचारखर्च दीड लाखावरुन 5 लाख करण्यात येणार.
– राज्यभर ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ अंतर्गत 700 दवाखाने सुरु करणार.

विधानसभेत फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करीत आहेत. बघा, त्याचे हे थेट प्रक्षेपण

LIVE | Presenting #MahaBudget2023 for Maharashtra..#BudgetSession2023 #budget #Budget2023 https://t.co/q7wWowuzmX

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 9, 2023

अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा आणि तरतुदी अशा
– गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत
– गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
– आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

– धनगर समाजाला 1000 कोटी रुपये
– महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
– 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार

– राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत
– चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
– महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर

Maharashtra Budget 2023 Big Announcement for Farmers


Previous Post

Maharashtra Budget : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात तुमच्यासाठी काय? घ्या जाणून…

Next Post

#MahaBudget2023 राज्यातील लाखो महिलांसाठी मोठी घोषणा; एसटी प्रवासासह येथे मिळणार लाभ

Next Post

#MahaBudget2023 राज्यातील लाखो महिलांसाठी मोठी घोषणा; एसटी प्रवासासह येथे मिळणार लाभ

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group