मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प असल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करीत आहेत. तत्पूर्वी फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. महाराजांना पुष्पहार अर्पण केला. अपेक्षेप्रमाणे फडणवीसांनी शेतकरी व महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे.
अर्थमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पात दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. यातील पहिली मोठी घोषणा एसटी प्रवासासाठी आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे राज्यभरात प्रवास करणाऱ्या लाखो महिलांना याचा थेट लाभ होणार आहे. राज्य सरकारने चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर केले आहे. तसेच, महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर स्थापन केले जाणार आहे.
?लेक लाडकी योजना: पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५ हजार, इयत्ता चौथीत ४ हजार, ६वीत ६ हजार, ११वीत ८ हजार तर १८ वर्षानंतर ७५ हजार रुपये देणार.
?महिलांना एसटीच्या तिकीटात ५० टक्के सवलत- उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis#पंचामृतअर्थसंकल्प#MahaBudget2023 pic.twitter.com/ROHjUfTHFj— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) March 9, 2023
मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना राबविण्यात येणार असून पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना याचा लाभ मिळणार आहे. जन्मानंतर मुलीला 5 हजार रुपये, पहिलीत चार हजार रुपये, सहावीत 6 हजार रुपये, तर अकरावीत 8 हजार रुपये या टप्प्याने मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये मिळणार आहेत.
नोकरी करणाऱ्या महिलांना सध्या मासिक १० हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन असल्यास व्यवसाय कर भरावा लागतो. महिलांची क्रयशक्ती वाढविण्यासाठी ही मर्यादा वाढवून २५ हजार रूपये करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे मासिक २५ हजार रुपयांपर्यंत वेतन असलेल्या महिलांना कोणताही व्यवसाय कर भरावा लागणार नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेत तिकिट दरात महिलांना 50 टक्के सवलत असणार आहे. तसेच शासन लवकरच चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर, तर कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर तसेच मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना करण्यात येईल. त्यासोबतच महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रित पर्यटन धोरण तयार करण्यात येईल.
‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार केले जाणार आहेत. अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना राबविण्यात येईल. या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा दिल्या जातील. या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले
LIVE | Presenting #MahaBudget2023 for Maharashtra..#BudgetSession2023 #budget #Budget2023 https://t.co/q7wWowuzmX
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) March 9, 2023
अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा आणि तरतुदी अशा
अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प.
पंचामृत ध्येयावर आधारित
१. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
२. महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
३. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
४. रोजगारनिर्मिती
५. पर्यावरणपूरक विकास
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना मिळणार आहे. यासाठीच सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 12 हजार रुपये मिळतील. प्रति शेतकरी, प्रति वर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार आहे. केंद्र सरकारचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना प्रतिवर्ष मिळणार आहेत. राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे. तशी घोषणा फडणवीसांनी विधिमंडळात केली.
– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाचे यंदाचे हे 350 वे वर्ष. यानिमित्त या महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद
– आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारणार. त्यासाठी 50 कोटी रुपये
– मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने उभारणार : 250 कोटी रुपये
– शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारणार. तसेच, शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन यासाठी 300 कोटी रुपये
– महिलांना राज्य परिवहन महामंडळांना बस प्रवासाच्या तिकीट दरात सरसकट 50 टक्क्यांची सूट;
– महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचारखर्च दीड लाखावरुन 5 लाख करण्यात येणार.
– राज्यभर ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ अंतर्गत 700 दवाखाने सुरु करणार.
– गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत
– गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
– आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
– धनगर समाजाला 1000 कोटी रुपये
– महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
– 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
Maharashtra Budget 2023 Big Announcement for Women’s