नवी मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या आठवडाभरापासून राज्यात उन्हाचा चांगलाच तडाका जाणवत आहे. काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत असताना उन्हाळी चांगले तापू लागले आहे. त्यातच आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे लाखोच्या संख्येने अनुयायी जमले होते. मात्र भर उन्हात अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला त्यापैकी १५ जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यातील आठ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते.
प्रसिध्द निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देशाचे केद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला राज्यातील लाखो नागरिकांना उपस्थिती लावली होती. यावेळी शहा पुढे म्हणाले, मी दिल्लीतून फक्त धर्माधिकारी यांच्या सन्मानासाठी येथे आलो आहे. प्रचंड उन्हाची पर्वा न करता लाखो लोक येथे जमलेले आहेत. यावरून दिसते की तुमच्या मनात अप्पासाहेबांबद्दल किती प्रेम आहे. म्हणजे खुद्द अमित शहा यांनी देखील या उन्हाच्या तीव्रतेचा आपल्या भाषणात उल्लेख केला होता. कडक व रणरणतै ऊन असूनही राज्यातील अनेक लोक या पुरस्कार सोहळ्यासाठी हजर होते.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1647642238900670464?s=20
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमा दरम्यान उपस्थितांपैकी अनेकांना उष्माघात झाला असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
ऊन-तहान हे सगळे विसरून लोकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. दुपारच्या टळटळीत उन्हातही हा सोहला डोळ्यात साठवून घेण्यासाठी अनुयायांनी प्रचंड गर्दी केली होती. परिणामी, उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने अनेकांना चक्कर आली. उष्माघातामुळे १५ अनुयायांची तब्येत बिघडली असून ८ अनुयायांचा एमजीएम रुग्णालयामध्ये उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तसेच प्रकृती बिघडलेल्या ९ अनुयायांना वाशी महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खारघर येथील एमजीएम रुग्णालयाला भेट देऊन रुग्णालयात दाखल केलेल्या अनुयायांची भेट घेतली आहे. तसेच वाशी महापालिकेच्या हॉस्पीटलमध्ये भरती केलेल्या अनुयायांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे.
https://twitter.com/ANI/status/1647644657416019968?s=20
Maharashtra Bhushan Award Heat Stroke 8 Death