नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे राजू पाल हत्याकांडातील प्रमुख साक्षीदार उमेश पाल याची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अतिक अहमद व अश्रफ यांना मदत करणाऱ्या संशयिताचा साथीदार गुड्डू मुस्लिम याचा नाशिकमध्ये एका संशयितासोबत संवाद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित वेलकम हॉटेलचा वेटर वाकर याची शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यात दिल्ली पोलिसांनी नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा पोलिसांच्या मदतीने चौकशी केली. मात्र चौकशीनंतर पोलिसांनी संशयिताला सोडून दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
उमेश पाल हत्याकांडातील संशयित अतिक व अश्रफ यांचा साथीदार गुड्डू मुस्लिम याचा नाशिकमध्ये वेलकम हॉटेलचा वेटल वाकर याच्यासोबत फोनवरून संवाद झाल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. गुड्डू मुस्लीम व त्याचा साथीदारांविरोधात दाखल शस्त्रास्त्र बंदी कायद्यांविरोधात गुन्ह्याच्या तपासासाठी दिल्ली पोलिसांनी नाशिकमध्ये दाखल होत नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मदतीने वाकर याला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली.मात्र या प्रकरणात नाशिकमधून अद्याप कोणालाही अटक झालेली नसल्याचे नाशिक शहर पोलिस गुन्हे शाखा उप आयुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली आहे.
Delhi Police Nashik Suspect Inquiry UP Murder