‘मुंबईसह कोकण वगळता पुढील आठवड्यात पाऊस कमीच
जून आणि जुलै महिने निघून गेले. आता ऑगस्ट महिना सुरू आहे. गेल्या दोन महिन्यात राज्याच्या काही भागात अतिवृष्टी तर काही भागात पावसाची प्नतिक्षाच आहे. सहाजिकच ऑगस्ट महिन्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. खासकरुन शेतकऱ्यांचे. अनेक भागात अद्यापही पेरण्या नाहीत. त्यामुळे राज्यात पावसाची स्थिती या आठवड्यात कशी असेल हे पाहू या…
ऑगस्ट ५ पर्यन्त ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम पावसाच्या वातावरणानंतर आज पासून पुढील आठवडाभर म्हणजे रविवार १३ ऑगस्टपर्यन्त मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
मुंबईसह कोकणात अति जोरदारपणे कोसळलेल्या पावसाची तीव्रताही येत्या ह्या आठवड्यात काहीशी कमी होण्याची शक्यता जाणवते.
सह्याद्रीच्या घाटमाथा धरण जलसंचय क्षेत्रात गेले ४० दिवस जोरदारपणे कोसळलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील धरणे १ ऑगस्टला ७०‰ पोहोचली. परंतु तेथेही आता पावसाचे प्रमाण काहीसे कमी होण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे धरणे १००% भरून ओसंडणे व नदी-नाल्यांना पूरपाण्याच्या अपेक्षेसाठी चांगलाच कस लागणार आहे.
एकंदरीत पावसाच्या पाण्यावर जगवलेली खरीपातील पिकांना चांगल्या पावसा अभावी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात ओढ बसण्याची शक्यता जाणवते.
तसेच खरीपासारखेच येणाऱ्या रब्बी हंगामाच्या नियोजनासाठीही जपून पावले टाकावी लागतील, असे जाणवते.
आज इतकेच!
माणिकराव खुळे, ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ्, भारतीय हवामान खाते, पुणे. मो. ९४२२०५९०६२, ९४२३२१७४९५
Maharashtra August Week Forecast Climate Weather