गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हायटेक कामकाज व नव्या सुविधांसह होणार हिवाळी अधिवेशन; असे आहे जबरदस्त नियोजन

by India Darpan
डिसेंबर 18, 2022 | 9:38 pm
in राज्य
0
DSC 1577 1140x570 1

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या सत्राला उद्या दि. 19 डिसेंबर पासून प्रारंभ होत आहे. सभागृहातील सर्व सदस्यांना नव्या लॅपटॉपसह, वायफाय व अन्य विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विधिमंडळ सत्रातील उपलब्ध सुविधांबाबतचे नवे कोरे ॲप तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक सदस्यांकडे उपलब्ध केलेली डीजीटल माहिती पुस्तिका यामुळे यावेळेचे अधिवेशन अधिक हायटेक व नवीन सुविधांसह सुरू होत आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा आज विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. या बैठकीला विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह विधिमंडळ सचिवालय,संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

विधानभवन परिसर आणि बाहेरील व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे. ट्रॅफिक आणि पार्किंगचे नियोजन करण्यात आले आहे. विधिमंडळ परिसर आणि शहरातील महत्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. महिला पोलिसांसाठी विशेष काळजी घेण्यात आली असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी सांगितले.

महिला आमदारांसाठी विधानभवनात शिशू संगोपन कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचे विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी सांगितले. याशिवाय विधानसभा अध्यक्ष यांनी केलेल्या सूचनेनुसार पत्रकारांसाठी अतिरिक्त कक्ष उभारण्यात आला आहे. इलेक्ट्रानिक्स माध्यमांसाठी वेगळी जागा उपलब्ध करण्यात आली आहे. अधिवेशनासाठी येण्यासाठी व जाण्यासाठी रेल्वे आणि विमान प्रवासासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यावेळी केल्या. विमानाच्या अतिरिक्त फेऱ्या सुटीच्या दिवसांमध्ये वाढविण्याची सूचना त्यांनी केली. रेल्वे अधिकाऱ्यांकडून त्यांना रेल्वेच्या परतीच्या प्रवासाची माहिती घेतली.

नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील सेटट्राईब ह्या आयटी कंपनीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या “महा असेंम्बली” ह्या ॲप चे सादरीकरण यावेळी करण्यात आले. ह्या ॲपद्वारे सर्व मंत्री, आमदार, सचिव स्तरावरील पदाधिकारी यांना अधिवेशनादरम्यान त्यांची निवास व्यवस्था, अधिवेशन दैनंदिनी, महत्वाच्या व्यक्तींची टेलिफोन निर्देशिका, इतर महत्वाचे सहाय्य, विविध बैठकांचा तपशील एका क्लिक वर मिळू शकणार आहे. अँड्रॉइड ॲप, वेब व्यू तसेच ॲपल स्टोरवर हे ॲप उपलब्ध असणार असून फक्त अधिकृत वापरकर्त्यानाच अर्थात सदस्यांनाच या ॲपचा एक्सेस असणार आहे.

याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थळदर्शक गुगल नकाशा असलेली माहिती पुस्तिका प्रत्येक सदस्यांच्या कक्षामध्ये व स्विय सहाय्यकांकडे उपलब्ध करुन दिली आहे. डिजीटल हाऊस किपींग, कपडे धुणे, भोजन सेवा, मदतनीस सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. याशिवाय निवास व अन्न बाबतीत असणाऱ्या कोणत्याही तक्रारीचा निपटारा 15 मिनिटात करण्याची तयारी विभागाने ठेवली आहे.

Maharashtra Assembly Winter Session

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिककरांना गडकरींचे गिफ्ट! नाशिकरोड ते द्वारका डबलडेकर उड्डाणपुलाला मंजुरी

Next Post

हे आहे भारतातील पहिले आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मंदिर; कुठे आहे ते? अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

India Darpan

Next Post
EiunZWKX0AM2Oc3

हे आहे भारतातील पहिले आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मंदिर; कुठे आहे ते? अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

ताज्या बातम्या

Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
bjp11

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का….या पदाधिका-यांचा भाजपमध्ये प्रवेश

जुलै 3, 2025
Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011