मुंबई – राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाचा कालचा पहिला दिवस गदारोळातच गेला. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज काय कामकाज होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आल्याने त्याचे पडसाद आजही विधिमंडळात उमटण्याची चिन्हे आहेत. त्याशिवाय मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, ईडीकडून सुरू असलेली चौकशी, कोरोना स्थिती यासह अनेक मुद्द्यांवर सत्ताधारी व विरोधक आमने सामने येणार आहेत.
अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. ते बघण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा
https://youtu.be/ymAOyTlePEM