India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अजित पवारांनी चांगलेच खडसावले.. फडणवीसांनी व्यक्त केली दिलगिरी… सभागृहात नेमकं काय घडलं?

India Darpan by India Darpan
March 15, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

.

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या सभागृहात गलिच्छपणाचे कामकाज सुरू आहे…अक्षरशः यांना कुणालाही विधीमंडळाच्या कामकाजात रस नाहीय… यांना बाकीच्याच कामात रस आहे. निर्लज्जपणाचा कळस झाल्यावर आमचा नाईलाज होतो अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात तीव्र संताप व्यक्त केला.

आज सकाळी सभागृहात मंत्री आणि संसदीय कामकाज मंत्री उपस्थित राहिले नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरले. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना रात्री अडीच – तीन वाजेपर्यंत काम करण्याची सवय आहे. त्यामुळे सकाळी अडचण होते हे आम्ही समजू शकतो, आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. परंतु चंद्रकांत पाटील अडीच – तीन वाजेपर्यंत जागत नाहीत… त्यांनी लवकर उठून आले पाहिजे. शिवाय संबधित जे मंत्री आहेत त्यांनी लवकर आले पाहिजे.. संसदीय कामकाज मंत्री असं काय काम करतात असा सवाल करतानाच संसदीय कामकाज मंत्री यांना जमत नसेल (मला त्यांना कमी लेखायचे नाही) मग त्यांनी थांबू नये अशा स्पष्ट इशाराच अजित पवार यांनी यावेळी दिला.

अर्थसंकल्प अधिवेशन किती महत्त्वाचे असते हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आपण अध्यक्ष झाल्यानंतर चांगल्या प्रथा पाडण्याचा प्रयत्न करताय, शिस्त लावण्याचा प्रयत्न करताय, आम्ही विरोधी पक्षाच्यावतीने सहकार्य करत आहोत. अर्थसंकल्पावर चर्चा करत असताना रात्री दहा वाजेपर्यंत कामकाज घ्या अशी विनंती केली त्याला मान्यता दिली. परंतु रात्री एक वाजेपर्यंत कामकाज चालले. त्या चर्चेला मंत्री हजर नव्हते याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. ज्यांना बाहेर जायचे आहे, एखादा मंत्री बाहेर गेला तर कामकाज थांबवावे लागते, तरीही आम्ही समजून घेतले. मंत्री वॉशरुमला, चहा प्यायला गेले असतील. आम्ही जेव्हा सभागृहात असायचो त्यावेळी सकाळी नऊ वाजता हजर असायचो. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून फुशारकी सांगत नाही असेही अजित पवार म्हणाले.

मंत्र्यांना विधिमंडळात काम करण्यात कोणताही रस नाही.सभागृहात आश्वासित केलेल्या सर्व बैठका सुध्दा होत नाहीत. विधिमंडळाची गरिमा राखण्यात सत्ताधारी अपयशी ठरत आहेत. संसदीय कार्यमंत्री देखील सभागृहात कायमच अनुपस्थित असतात. त्यांना जमत नसेल तर त्यांनी पद सोडावं.#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३

— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 15, 2023

गेली ३०-३२ वर्ष या सभागृहाची परंपरा कशी चालत आली आहे. आपण कशी राखली पाहिजे व नंतरच्या लोकांनीही राखली पाहिजे. या विधीमंडळाकडे संपूर्ण महाराष्ट्र बघत असतो. आज सकाळी साडे नऊला कामकाज सुरू झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना जास्त व्याप असतो याची जाणीव आहे. परंतु ते नसले तरी संसदीय कार्यमंत्री तरी किमान साडे नऊला येऊन बसले पाहिजेत. चंद्रकांत पाटील यांच्यावर आमचा आरोप नाही परंतु त्यांनी जबाबदारी घेतली तर येऊन बसा ना बाबा अशा शब्दात अजित पवार यांनी खडसावले.

आज सभागृहात मंगलप्रभात लोढा यांची एक लक्षवेधी झाली सहा मंत्री गैरहजर… अध्यक्ष महोदय यांना ‘जनाची नाही मनाची तरी वाटत नाही का?’ … मला वाईट वाटते असे शब्द वापरायला असेही अजित पवार म्हणाले. एक दीड वाजेपर्यंत सदस्य बसले आणि सकाळी साडे नऊला दोन्ही बाजूचे सदस्य लक्षवेधी होते ते आले. आणि मंत्रीच नाहीत. असे काय काम मंत्र्यांना आहे असा संतप्त सवाल अजित पवार यांनी करतानाच अहो तुम्हाला मंत्री करत असताना मागे – मागे पळत असता… मी बोलत नाही सकाळी कालिदास कोळंबकर यांनी तुम्ही मंत्री होण्यासाठी आणि मंत्री करा सांगण्यासाठी पुढे- पुढे जाता असे सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.

विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना कामकाजाच्या नियमित वेळेत येणे ही महत्त्वपूर्ण बाब आहे. ही गोष्ट राज्याच्या गतिमान सरकारच्या मंत्र्यांना मात्र मान्य नाही असे दिसते. #अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३ @mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/mtTmK93Ib4

— NCP (@NCPspeaks) March 15, 2023

मंत्री झाल्यावर सभागृहाची जी परंपरा आहे, जी कामे आहेत ती तुमच्यावर वैधानिक काम दिले आहे. अध्यक्ष महोदय तुम्हालाही ती गोष्ट आवडली नाही असे तालिका अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सांगितले. देवेंद्र आम्ही तुम्हाला सिन्सियर म्हणून बघतो तुम्ही त्याठिकाणी उच्चविद्याविभुषित अशी तुम्हाला नावे दिली आहेत. पण तुमचेही लक्ष नाही. तुम्ही तुमच्या काही मंत्र्यांना सांगा अशा शब्दात अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

यापूर्वीचे संसदीय कामकाज मंत्री संपर्क साधायचे. ही पध्दत होती परंतु हे जे काही चाललंय ते योग्य नाही. आज आठ लक्षवेधी होत्या त्यात सात लक्षवेधी सभागृहात मंत्री नसल्याने पुढे ढकलण्याची नामुष्की सरकारवर आली याबाबत अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Maharashtra Assembly Session Ajit Pawar Devendra Fadnavis


Previous Post

खोदा पहाड, निकला चुहा… बजेटचा डोंगर, निघाला उंदीर… विरोधक आमदारांचे आजही आंदोलन (व्हिडिओ)

Next Post

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्ययंत्रणा कोलमडली; रुग्ण व नातेवाईकांचे प्रचंड हाल

Next Post

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्ययंत्रणा कोलमडली; रुग्ण व नातेवाईकांचे प्रचंड हाल

ताज्या बातम्या

मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केली ही मोठी घोषणा

March 24, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज खर्चाची तयारी ठेवावी; जाणून घ्या, शनिवार, २५ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 24, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – शनिवार – २५ मार्च २०२३

March 24, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – १ कोटीची लॉटरी

March 24, 2023

आदिवासी तरुणांना संधी का मिळत नाही? सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहचतात का? खरं आणि जळजळीत वास्तव हे आहे…

March 24, 2023

कोल्हापूरमध्ये येणार हा मोठा प्रकल्प… ८ हजार कोटींची गुंतवणूक… ५ हजार जणांना रोजगार

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group