India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या दोन कन्या चमकणार प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये

India Darpan by India Darpan
January 21, 2023
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –  येत्या २६ जानेवारी रोजी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या दिमाखदार परेडमध्ये महाराष्ट्राच्या दोन कन्या चमकणार आहेत. त्यात नाशिक आणि अहमदनगरच्या कन्येचा समावेश आहे. नाशिकचे व्यापारी अभिमन्यू सिंग राठोड यांची कन्या दुर्गेश नंदिनी आणि अहमदनगरची आयशा नगरवाला (वय १६)  या दोन विद्यार्थिनी आहेत. दोघेही नॅशनल कॅडेट कॉर्प (NCC)च्या सदस्य आहेत आणि राजस्थानस्थित पिलानीच्या बिर्ला बालिका विद्यापीठाच्या (BBV) बँडचे प्रतिनिधित्व करत आहेत.

दुर्गेश नंदिनी ही इयत्ता नववीची विद्यार्थिनी आहे. ती यापूर्वी मार्च २०२२ पर्यंत नाशिकस्थित फ्रावशी इंटरनॅशनल अकादमीची विद्यार्थिनी होती. जिथे तिने आठवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आयशाने अहमदनगरच्या द आयकॉन पब्लिक स्कूलमधून तिचे १०वी इयत्तेचे शिक्षण पूर्ण केले. ती सध्या ११वीत शिक्षण घेत आहे.

महाराष्ट्रात जन्मलेल्या आणि वाढलेल्या या दोन मुली २६ जानेवारीच्या कर्तव्यपथ (आधीचा राजपथ), नवी दिल्ली येथे सर्वात प्रतिष्ठित प्रजासत्ताक दिन (आर-डे) परेडमध्ये सहभागी होणार आहेत. या दोन्ही NCC कॅडेट्सचा समावेश असलेल्या प्रतिष्ठित बँडचा भाग असतील. खास म्हणजे, बीबीव्ही ही देशभरातील एकमेव शाळा आहे, जी १९६० पासून आर-डे परेडमध्ये सहभागी होण्यास पात्र आहे. ही शाळा सुप्रसिद्ध बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट (बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट) द्वारे चालवली जाते) दुर्गेश नंदिनी सॅक्सोफोन वाजवणार आहे तर आयशा २५ हून अधिक सदस्य असलेल्या बॅंडमध्ये ट्रम्पेट वाजवणार आहे.

बीबीव्ही बँड गेल्या सप्टेंबरपासून पिलानी शाळेच्या प्रांगणात दररोज दोन-तीन तासांचा सराव करत आहे. “या मुलींचा बँड आता नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या शिबिरात (RDC) परेडची तयारी करत आहे. १ जानेवारीपासून, दररोज पहाटेपासून, जेव्हा तापमान अलीकडे १.५ अंश सेंटीग्रेडपर्यंत खाली घसरले आहे. इतकेच नाही तर, BBV च्या मुली त्यांचा दैनंदिन बँड सराव सुरू करण्यापूर्वी दररोज सकाळी १० किलोमीटरचा व्यायाम करतात. त्यांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी हा व्यायाम आवश्यक आहे”, असे बीईटीचे संचालक मेजर जनरल (निवृत्त) एसएस नायर यांनी सांगितले.

Maharashtra 2 Girls Republic Day Parade Performance


Previous Post

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीसाठी प्रवेश घ्यायचाय? तातडीने येथे करा अर्ज

Next Post

न्यायालयाने हिसका दाखवताच विधानसभा अध्यक्षांसह मंत्री थेट हजर; नेमकं काय घडलं?

Next Post

न्यायालयाने हिसका दाखवताच विधानसभा अध्यक्षांसह मंत्री थेट हजर; नेमकं काय घडलं?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group