नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यात पुण्यातील कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच कक्ररोगामुळे निधन झाले आहे. या दोन्ही जागांवर आता पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, ३१ जानेवारी रोजी उमेदावारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल. ७ फेब्रुवारी पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे. ८ फेब्रुवारी उमेदवारी अर्जांची छाननी, १० फेब्रुवारी रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख असेल. २७ फेब्रुवारी रोजी मतदान होईल आणि २ मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.
बिनविरोध होणार की
दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील व्यक्तीला भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विधानसभेचा कार्यकाळ २०२४ पर्यंत आहे. म्हणजेच, निवडून येणारा आमदार हा एक ते सव्वा वर्षांसाठीच असेल. त्यामुळे या रिक्त जागांवर बिनविरोध निवडणूक होणार की, चुरशीची लढत होणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.
Maharashtra 2 Assembly Seats By Poll Election Declared
Pune Kasba Pimpri Chinchwad BJP Politics