India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महाराष्ट्रातील NSSचे हे १४ विद्यार्थी सहभागी होणार प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात

India Darpan by India Darpan
January 20, 2023
in राष्ट्रीय
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रजासत्ताक दिनी होणा-या पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर सध्या राजधानीत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजनेचे(एनएसएस) 14 आणि गोव्यातील 2 असे एकूण 16 विद्यार्थी-विद्यार्थीनी कसून सराव करीत आहेत.

74व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर होणा-या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने एनएसएस सराव शिबिराला येथील इंटरनॅशनल यूथ होस्टेलमध्ये 1 जानेवारी 2023 पासून सुरुवात झाली आहे. देशभरात 132 विद्यापीठातील 213 शैक्षणिक संस्थांमधून 200 एनएसएसचे विद्यार्थी- विद्यार्थीनी या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनातील शिबिरात विविध टप्प्यातील निवड प्रक्रियेतून सहभागी झाले आहेत. यामध्ये पश्चिम (पुणे) विभागात समावेश असणा-या महाराष्ट्रातून क्रमश: 7 विद्यार्थी व विद्यार्थीनी तर गोव्यातून प्रत्येकी 1 विद्यार्थी आणि 1 विद्यार्थीनी असे एकूण 16 विद्यार्थी-विद्यार्थीनी या शिबीरात सराव करीत असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर संचालक डॉ. कमल कुमार कर यांनी यावेळी दिली.

एनएसएस चे हे शिबीर 31 जानेवारी 2023 पर्यंत चालणार असून यामध्ये दररोज सकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत योगासने, बौध्दिकसत्र, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पथसंचलनाचा सराव करण्यात येत, असल्याचे श्री कर यांनी सांगितले. 1 ते 6 जानेवारीपर्यंत सकाळी व सायंकाळी जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर पथसंचलनाचा सराव चालला. 7 ते 23 जानेवारीपर्यंत कर्तव्यपथावर पथसंचलनाचा कसून सराव सुरु असल्याचे पुणे विभागाच्या क्षेत्रिय कार्यालयाचे युवा अधिकारी अजय शिंदे यांनी माहिती दिली.

या शिबिरात प्रत्येक राज्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम रोज साजरा केला जातो. महाराष्ट्राचा चमु दररोज राज्याची लोक कला सादर करीत असल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी सांगितले. १५ जानेवारीला मकरसंक्रांत‍ीचा खास सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र आणि गोव्यातील विद्यार्थ्यांनी सादर केला.

एनएसएस शिबीरात महाराष्ट्रातील या विद्यार्थी-विद्यार्थीनींचा समावेश
एनएसएसमध्ये सामील होणारे महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी विविध शाखेतील अभ्यासक्रमांचे उच्च शिक्षण घेत असतात. यावर्षी महाराष्ट्राच्या चमूत मुंबईतील अथर्व अभियांत्रिकी महाविद्यालयाचा साहिल भोसले, सातारा जिल्ह्यातील बलवंत महाविद्यालयाचा श्लोक वरूडे, पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील डॉ.बी.एल.पुरंदरे कला महाविद्यालयाचा जयवंत दळवी, सोलापूर जिल्ह्यातील अकलुजमधील एस.एम. महाविद्यालयाचा सत्यजित चव्हाण, नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमधील एल.बी.एस. महाविद्यालयाचा विष्णू जाधव, मुक्ताईनगर येथील श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयाचा प्रफुल्ल येमनेरे, पुणे जिल्ह्यातील गणेशखिंड येथील मॉर्डन महाविद्यालयाचा अनमोल जाधव या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मुंबईतील के.सी महाविद्यालयाची संजना कऱ्हाडकर, श्रीमती पी.एन.दोशी महिला महाविद्यालयाची स्नेहल पांडे, ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची दिपशिखा सिंह, नवी मुंबईतील एमजीएमयू, वैद्यकीय महाविद्यालयाची आकांक्षा पाटील, परभणीतील पशु वैद्यकीय महाविद्यालयाची साक्षी काशीकर, रायगड जिल्ह्यातील अलीबाग येथील पी.पी.इ.एस.ए.सी.एस. महाविद्यालयाची संयुक्ता हुजरे, कोल्हापूर जिल्ह्यातील दूध साखर महाविद्यालयाची करीना जमादार हिचा समावेश आहे. यासोबतच गोवा राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये विद्या प्रबोधिनी महाविद्यालयाचा विद्यार्थी विनयानुज कुशवाह, म्हापूसा येथील सेंट झेवियर महाविद्यालयाची विद्यार्थींनी सोहाली नागवेंकर हिचाही समोवश आहे.

Maharashtra 14 NSS Students Republic Day Parade


Previous Post

पदवीधर निवडणुकीत मतदान नोंदवतानाच्या ही घ्या खबरदारी; …अन्यथा मत बाद झालेच समजा

Next Post

कर्नाळा पक्षी अभयारण्याबाबत वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले हे निर्देश

Next Post

कर्नाळा पक्षी अभयारण्याबाबत वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group