अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सध्या शिवसेनेत राजकीय घमासान सुरु असतांनाच आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा ६२ वा वाढदिवस साजरा होतो आहे. शिवसेना पक्ष प्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड शहरातील शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्त्यांनी सप्तश्रृंगी देवीच्या मंदीरात त्यांना दिर्घायुष्य लाभो आणि सध्याच्या या कठीण प्रसंगात त्यांना कार्यकर्त्यांची साथ मिळो यासाठी महाआरती केली. यावेळी त्याच ठिकाणी शिवसैनिकांच्या पक्ष नोंदणीला सुरुवात करण्यात आली.