इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपत्ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मित एनडीआरएफला हाक दिल्यानंतर ती धावून आल्याशिवाय राहत नाही. मध्य प्रदेश येथील अशाच एका घटनेत एनडीआरएफने पुन्हा एकदा स्वत:चे कौशल्य पणाला लावले आहे. ३०० फूट खोल बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या या लहान मुलीला वाचविण्यासाठी एनडीआरएफ गेल्या ४८ वर्षांपासून संघर्षरत आहे. अखेर ४८ तासांनी हे बचावकार्य संपले. या चिमुकलीला बाहेर काढण्यात आले.
देशातील कुठल्याही भागात आपत्ती आल्यानंतर धावून जाण्यास तत्पर असलेल्या एनडीआरएफने मध्य प्रदेशातील चिमुकलीचा जीव वाचवून संवेदनशीलतेचा परिचय दिला आहे. मध्य प्रदेशच्या सीहोर जिल्ह्यातल्या मुंगावली येथे राहणारी तीन वर्षांची सृष्टी खेळता खेळता अचानक शेतातील बोअरवेलमध्ये पडली. ती जेव्हा बोअरवेलमध्ये पडली त्यावेळी ती २० फूटावर अडकली होती. पण आता ती १०० फूटांपर्यंत खाली गेली. त्यामुळे तिला वाचवण्यासाठी अडचणी आल्या. सृष्टीला पाईपच्या सहाय्याने ऑक्सिजन देण्यात आला..
सृष्टीला वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम, भारतीय लष्कराचे जवान आणि स्थानिक प्रशासनाच्या टीमकडून प्रयत्न केले. बुधवारी लष्कराच्या जवानांनी बोअरवेलमध्ये रॉड टाकून सृष्टीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सृष्टीला १० फुटांपर्यंत वर काढण्यात आले होते. पण तिचे कपडे फाटल्यामुळे ती आणखी खाली गेली. सृष्टी ज्याठिकाणी बोअरवेलमध्ये पडली आहे तो परिसर खडकाळ असल्याने रेस्क्यू ऑपरेशन करताना अनेक अडचणी येत होत्या.
रोबोटची घेणार मदत
सृष्टीला लवकर बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी रोबोटिक टीमला दिल्लीवरून बोलावण्यात आले. सृष्टीला रोबोटच्या माध्यमातून रेस्क्यू करण्याचे निश्चित झाले. दुसरीकडे बोअरवलेच्या समांतर खोदकाम करण्यात आले. यामुळे सृष्टीजवळ पोहचणे शक्य होईल. सृष्टीला सुखरुप बाहेर काढण्यासाठी सर्वस्तरावरुन प्रार्थना केली जात होती.
अखेर बचावकार्य संपले
सृष्टीला तब्बल ४८ तासांनी बाहेर काढण्यात आली. तिची प्रकृती खुपच खालावली होती. बाहेर काढल्यानंतर तिने काही वेळ मृत्यूशी संघर्ष केला पण तो अपयशी ठरला. अखेर तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Madhya Pradesh Girl 300 Feet Borewell Rescue Operation