मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने कर्जधारकांना जोराचा झटका दिला आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट वाढविले असून त्याचा परिणाम मासिक हफ्त्यांचे दरवाढीच्या रूपात दिसून येणार आहे.
देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसीने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेनं मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेटमध्ये १५ बेस पॉईंट्सपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली. हे नवीन दर ७ जून २०२३ पासून लागू झाले आहेत. हे दर वाढवल्याने गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज महाग होणार आहे. बँकेनं वेगवेगळ्या कालावधीसाठी कर्जदरात ५ ते १५ बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. आता ग्राहकांसाठी कार लोन आणि पर्सनल लोनचे ईएमआय वाढणार आहे.
बँकेचा ओव्हरनाईट एमएलसीआर आता ८.१० टक्के आहे. तर एका महिन्याचा एमएलसीआर ८.२० टक्के करण्यात आला आलाय, तीन महिन्यांचा एमएलसीआर आता ८.५० टक्के झाला आहे. तर दुसरीकडे लेंडर्सचा सहा महिन्यांचा एमएलसीआर आता ८.८५ टक्के आहे. याशिवाय, दोन वर्षांचा एमएलसीआर ९.०५ टक्के आणि तीन वर्षांचा एमएलसीआर ९.१० टक्के करण्यात आला आहे. एचडीएफसी बँकेचा एक वर्षांचा एमएलसीआर ९.०५ टक्के, दोन आणि तीन वर्षांचा एमएलसी आर ९.१० टक्के आणि ९.२० टक्क्यांवर गेला आहे.
एमएलसीआर रेट हा एक बेसिक रेट असतो ज्यावर बँका कर्ज देण्याचे काम करतात. एचडीएफसी बँकेच्या वाढलेल्या एमसीएलआरचा गृहकर्ज घेणाऱ्यांवर परिणाम होणार नाही. हे दर केवळ पर्सनल लोन, ऑटो लोन आणि एमएलसी आरशी जोडलेल्या इतर कर्जाच्या जुन्या कर्जदारांसाठी लागू होतील.
HDFC Bank Loan EMI MLCR Banking Finance