India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

बागलाणमध्ये लंपी आजाराचा शिरकाव; तालुक्यातील एवढी जनावरे बाधित, पशुसंवर्धन विभाग सतर्क

India Darpan by India Darpan
September 15, 2022
in स्थानिक बातम्या
0

 

निलेश गौतम, इंडिया दर्पण वृत्तसेवा
बागलाण तालुक्यातील एक लाख पाच हजार पशुधनाला लंपी या संसर्गजन्य रोगापासून वाचविण्यासाठी तालुक्याचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. बागलाण तालुक्यात सात जनावरांना लंपी या साथ रोगाची लागण झाली आहे. पाहिल्या टप्यात ५ हजार लसींच्या डोसची मागणी करण्यात आल्याची माहिती तालुका पशुधन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

लंपी आजारांवरील औषध साठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. तालुक्यातील मोठ्या प्रमाणात असलेल्या पशुधनाला सेवा देण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकऱ्यांची ११ पदे मंजुर असतांना केवळ एकच पद भरले असल्याने रिक्त पदांमुळे लाखभर पशुधनाला सेवा देताना पशुसंवर्धन विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

लंपी या संसर्गजन्य आजाराची तालुक्यात कोटबेल, मुंजवाड, पिंपळदर या ठिकाणी जनावरे आढळून आल्याने तालुका पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. पहिल्या टप्प्यात ५ हजार लसी उपलब्ध होण्यासाठी या विभागाने वरिष्ठ स्तरावर मागणी केली आहे तर बहुतांश पशुपालक खाजगी लस घेऊन आपल्या जनावरांना देत असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ सी. पी. रुद्रवंशी यांनी दिली आहे. लंपी हा आजार गाय, म्हैस, बैल व अन्य पाळीव जनावरांमध्ये येत असल्याने शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवहान तालुका पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

सायंकाळच्या वेळेस जनावरांच्या गोठ्यात डास मच्छर, चिलटे, गोचिड, व अन्य चावणारे कीटक येऊ नयेत यासाठी गोठ्यात धूर करावा कडूनिबाचा पाला जाळण्यात यावा दोन जनावरे यांच्या मध्ये अंतर ठेवावे, गोठ्यात निर्जंतुकीकरनाचे फवारे मारण्यात यावे पशुपालकांनी काळजी घेतल्यास लंपी या संसर्ग जन्य आजाराला आळा घालता येणार असल्याचे तालुका पशुवैद्यकीय अधिकारी रुद्रवंशी यांनी सांगितले आहे. तर बागलाण हा कृषी समृद्ध तालुका असुन मोठ्या प्रमाणत पशुपालक या तालुक्यात आहेत लाखाहून अधिक जनावरे तालुक्यात आहेत. मात्र त्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी गेली अनेक वर्षे पासून रिक्त जागेवर पशुवैद्यकीय अधिकरी नसल्याने आहे त्या पशुवैद्यकीय अधिकारीवर तालुक्याची जबाबदारी आहे.

तालुक्यातील अनेक ठिकणी आजारी व दूभते जनवारांना वेळेवर उपचार मिळण्यात अडचण निर्माण होते. अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करून ही तालुक्याला पशुवैद्यक मिळत नसल्याने तालुक्यातील पशुपालकांमध्ये मोठया प्रमानावर नाराजी आहे. तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्याना पूर्ण वेळ पशुवैद्यक देण्यात यावा अशी मागणी माजी आमदार दिपीका चव्हाण यांनी केली आहे. तर लंपी आजारावर जास्तीत जास्त लसीकरण करून तालुका लंपी आजार मुक्त करण्याचा मानस तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ सी.पी. रुद्रवंशी यांनी व्यक्त केला आहे.

Lumpi Disease Animals Baglan Taluka Infection


Previous Post

फॉक्सकॉन-वेदांत प्रकल्प गुजरातला का गेला? माजी उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी सर्व सविस्तर सांगितलं…

Next Post

इंडिया दर्पण विशेष लेखमाला – निसर्गयात्री – झारखंडची लेडी टारझन : जमुना तुडू

Next Post

इंडिया दर्पण विशेष लेखमाला - निसर्गयात्री - झारखंडची लेडी टारझन : जमुना तुडू

ताज्या बातम्या

घटस्फोटांच्या चर्चांवर अखेर रणवीर सिंगने सोडले मौन; म्हणाला…

March 31, 2023

केवळ न्यायालयीन लढ्यावर इतक्या कोटींचा खर्च; अद्यापही न्यायालयाचा निकाल नाही

March 31, 2023

पीएमश्री योजनेत राज्यातील एवढ्या शाळांची निवड; केंद्र सरकारने दिली मान्यता

March 31, 2023

काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर मुंबादेवी मंदिर परिसराचा पुनर्विकास

March 31, 2023

भाजप आमदारांचा कारभार कसा आहे? पक्षाने केले सर्वेक्षण… असा आहे त्याचा निष्कर्ष…

March 31, 2023

यंदाचे मराठी साहित्य संमेलन अमळनेरमध्ये? हालचालींना वेग

March 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group