नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस अर्थात एलपीजीच्या घरगुती ग्राहकांना आता सिलिंडरसाठी रेशनिंगचा सामना करावा लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत, कनेक्शनधारक एका वर्षात १५ पेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकणार नाहीत. एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलिंडरही उपलब्ध होणार नाहीत. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शनधारक त्यांच्या इच्छेनुसार कितीही सिलेंडर मिळवू शकत होते.
एलपीजी गॅस सिलेंडरच्या वितरणासाठीचे सॉफ्टवेअर बदलण्यात आल्याचे वितरकांनी सांगितले आहे. सदर निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. घरगुती विनाअनुदानित सिलिंडर व्यावसायिकांपेक्षा स्वस्त असल्याने त्याचा वापर वाढल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
हा बदल तिन्ही तेल कंपन्यांच्या ग्राहकांसाठी करण्यात आला आहे. ज्यांनी अनुदानित घरगुती गॅसची नोंदणी केली आहे, त्यांना या दराने वर्षभरात फक्त बारा सिलिंडर मिळू शकतील. अतिरिक्त गरजेनुसार त्यांना विनाअनुदानित सिलिंडरच घ्यावे लागतील. वितरकांच्या म्हणण्यानुसार, रेशनिंग अंतर्गत एका कनेक्शनवर महिन्यात फक्त दोनच सिलिंडर घेता येतात. परंतु कोणत्याही परिस्थितीत ही संख्या निर्धारित १२ संख्येपेक्षा वर्षाला जास्त नसावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तर सिद्ध करावे लागणार
वितरकांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या ग्राहकाला अतिरिक्त गॅस सिलेंडर हवे असेल तर त्याला ते सिद्ध करावे लागेल. आणि तेल कंपनीच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतरच अतिरिक्त सिलेंडरची व्यवस्था केली जाऊ शकते.
LPG Gas Cylinder Refill New Rule Central Government