नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रडविणारा कांदा अशी ओळख असलेल्या कांद्याने यंदा उत्पादकांच्या डोळ्यात अश्रूधाराच आणल्या आहेत. कांद्याचा प्रश्न अधिक उग्र झाला आहे. उत्पादन खर्च तर सोडाच पण अत्यंत कवडीमोल भावाने कांदा विक्री होत असल्याने शेतकऱ्यांचा संयम आता संपत चालला आहे. कारण, जिल्ह्यातील नांदगाव येथे कांद्याला चक्क २५ पैसे प्रतिकिलो भाव मिळाल्याची वार्ता सध्या सर्वच शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण करणारी ठरली आहे.
१ फेब्रुवारी ते ३१ मार्च काळात विक्री झालेल्या कांदयालाच अनुदान मिळणार असल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक बाजार समितीत शेवटच्या दिवशी बंपर आवक झाली. त्यामुळे जिल्ह्यातील नांदगाव येथे २५ पैसे, सटाणा व सिन्नर येथे ५० पैसे तर करंजाड, येवला व कळवण येथे १ रुपया प्रतिकिलो अशी बोली व्यापा-यांनी लावली आणि शेतक-यांच्या मातीमोल दर कांद्यास मिळाला. त्यामुळे उत्पादन खर्चा एवढे पैसेही शेतक-यांच्या हाती पडू शकले नाही. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळण्या ऐवजी त्यांची लूटच झाल्याच पहावयास मिळाले.
कांद्याला जानेवारी महिन्यापासून भावात सातत्याने घसरण होण्यास सुरुवात झाली. उत्पादनासाठी लागणारा खर्च सुध्दा वसूल होत नव्हता. बाजारात विक्रीला कांदा नेल्यावर त्याला मातीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना कांद्याने चांगलेच रडवले. अनेक आंदोलने झाल्याने सरकारने त्यासाठी ३५० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले.पण, या अनुदानाचा परिणाम मात्र मार्च एण्डला झाला.
⬜?⬜?⬜
*ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात❓*तर मग
*इंडिया दर्पण* च्या
दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा?https://t.co/hbtHdVcAG4— India Darpan Live (@IndiaDarpanLive) March 29, 2023
⭕ खुशखबर! *उद्योगांना आता मिळणार विनातारण थेट ५ कोटीपर्यंत कर्ज* असा घ्या लाभ…
या क्रमांकावर साधा संपर्क…
https://t.co/6d8Ix6Dzua#indiadarpanlive #medium #small #scale #industry #loan #upto #5crore— India Darpan Live (@IndiaDarpanLive) April 2, 2023
Lowest Onion Rate in Nashik District APMC Farmers Trouble