बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आता हलक्या वजनाची बुलेट प्रुफ जॅकेट्स…इतके आहे वजन

by India Darpan
सप्टेंबर 25, 2024 | 8:05 pm
in संमिश्र वार्ता
0
PIC1EYVM e1727274810180

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डीआरडीओ म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेतील वैज्ञानिकांनी आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली येथील संशोधकांच्या सहकार्याने अभेद (ऍडवान्सड बॅलिस्टिक्स फॉर हाय एनर्जी डिफीट) नामक हलक्या वजनाची बुलेट प्रुफ जॅकेट्स विकसित केली आहेत. आयआयटी दिल्ली या संस्थेतील डीआरडीओ उद्योगविषयक शैक्षणिक उत्कृष्टता केंद्रात (डीआयए-सीओई) ही जॅकेट्स तयार करण्यात आली आहेत.

पॉलीमर्स आणि स्वदेशी बोरॉन कार्बाईड सिरॅमिक मटेरियल्स पासून ही जॅकेट्स तयार करण्यात आली आहेत. त्यांच्या रचनेची जुळवणी जास्तीचा ताण सहन करू शकणाऱ्या विविध साहित्यांमध्ये असलेल्या विशिष्ट गुणांवर आधारित असून त्यानंतर डीआरडीओच्या सहयोगासह त्याचे सुयोग्य नमुने आणि प्रतिकृती तयार करण्यात आले.

जॅकेट्ससाठी वापरण्यात आलेल्या आर्मर प्लेट्सनी नियमावलीनुसार संशोधन आणि विकासविषयक सर्व चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. ही जॅकेट्स उच्च पातळीच्या धोक्याला तोंड देऊ शकतात आणि ती भारतीय लष्करातील सामान्य कर्मचारीवर्गासाठी निश्चित केलेल्या गुणात्मक पात्रता निकषांतील कमाल वजन मर्यादेपेक्षा हलकी आहेत. वेगवेगळ्या बीआयएस स्तरांवर 8.2 किलो आणि 9.5 किलो किमान वजन असलेली ही अत्याधुनिक रचनेची जॅकेट्स पुढच्या आणि मागच्या बाजूसह 360 अंशातील संरक्षण देऊ करतात.

निवड-निकष पद्धतीच्या आधारे तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच मार्गदर्शनासाठी काही भारतीय उद्योगांची निवड करण्यात आली. तीन उद्योगांना तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यासाठी केंद्र सज्ज आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल डीआयए-सीओईचे अभिनंदन करत, केंद्रीय संरक्षण संशोधन आणि विकास विभाग सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ.समीर व्ही.कामत म्हणाले की या हलक्या वजनाच्या बुलेट प्रुफ जॅकेट्सच्या निर्मितीने डीआरडीओतर्फे यशस्वी संरक्षण संशोधन आणि विकासविषयक परिणामकारक परिसंस्थेचे उदाहरण घालून दिले आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रात उद्योग आणि शिक्षण क्षेत्र यांना सहभागी करून घेण्यासाठी वर्ष 2022 मध्ये आयआयटी दिल्ली या संस्थेत असलेल्या डीआरडीओच्या संयुक्त प्रगत तंत्रज्ञान केंद्रात बदल घडवून आणून डीआयए-सीओईची उभारणी करण्यात आली होती. हे केंद्र आता डीआरडीओ मधील शास्त्रज्ञ, शिक्षण क्षेत्रातील संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील भागीदारांसह प्रगत तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रकल्पांवर सक्रियतेने कार्य करत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध ठिकाणी वाहतूकीत असे केले बदल

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; पायाभरणीसह २२ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण

India Darpan

Next Post
PM to visit Maharashtra on 26 September 1

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; पायाभरणीसह २२ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे राष्ट्रार्पण

ताज्या बातम्या

Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011