मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील यशस्वी आणि प्रसिद्ध उद्योजकांचा विषय निघाला तर मुकेश अंबानी यांचे नाव सर्वात आधी घेतले जाते. मेहनत आणि वडीलधार्यांच्या आशीर्वादाने त्यांनी अनेक मोठे आव्हाने लिलया पार केले आहेत. त्यामुळे आज त्यांच्याकडे नाही, असे काहीच नाही. कोट्यवधी रुपयांच्या घरापासून ते कोट्यवधींच्या चारचाकी, हसते-खेळते कुटुंब, मागे-पुढे नोकर चाकर, अनेक यशस्वी उद्योग आणि जगामध्ये मान.
आज मुकेश अंबानी यांच्याजवळ सर्वकाही आहे. त्यांच्यासारखे यशस्वी उद्योजक आणि श्रीमंत व्यक्ती बनण्याची लोकांची इच्छा असते. परंतु हे सर्व करणे आजच्या काळात इतकी सोपी गोष्ट आहे का? बहुतेक नाही. तुम्हाला मुकेश अंबानी यांच्यासारखे व्हायचे असेल तर त्यांच्या जीवनाच्या आणि दिनचर्येच्या काही गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल. त्या गोष्टींना अंगिकारावे लागेल. तेव्हा कुठे तुमचे काम शक्य होईल. तर मग चला मुकेश अंबानी यांच्याबद्दलच्या १० गोष्टी जाणून घेऊयात.
सकाळी लवकर उठणे
मुकेश अंबानी पहाटे पाच ते साडेपाच वाजेदरम्यान उठतात. ही एक चांगली सवय आहे. तुम्ही सुद्धा ही सवय स्वीकारून आपली दिनचर्या सुधारू शकतात.
व्यायाम करणे
अंबनी सकाळी लवकर उठून सहा ते साडेसात वाजेपर्यंत जिममध्ये व्यायाम करतात. तिथे वर्कआउट करतात. त्यांच्या अँटिलिया या आलिशान माहालासारख्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर जिम आहे.
कमी न्याहारी
मुकेश अंबानी सकाळी आठ-नऊ वाजेदरम्यान कमीच न्याहारी घेतात. न्याहारीमध्ये पपईचा रस असतो. ते रविवारी दक्षिण भारतीय पदार्थ खाणे पसंत करतात.
कार्यालयात जाण्याची वेळ
मुकेश अंबानी सकाळी कार्यालयात जातात. कार्यालयात वेळेवर पोहोचण्यासाठी ते ९ ते १० वाजेपर्यंत तयार होतात.
आईचा आशीर्वाद
दररोज कार्यालयात जाण्यापूर्वी मुकेश अंबानी आपल्या आईचा आशीर्वाद अवश्य घेतात. पत्नी आणि मुलांना भेटूनच ते कार्यालयात जातात. ही चांगली सवय तुम्हीसुद्धा अंगिकारली पाहिजे.
या कारने कार्यालयात
मुकेश अंबानी आपल्या आवडत्या मर्सिडीज मेबॅक ६२ या कारने कार्यालयात जातात. या कारची किंमत जवळपास अडीच कोटी रुपये आहे.
काम असे होते सुरू
त्यांचे मुख्यालय नरिमन पॉइंट येथे आहे. तिथे ते ११ वाजेपर्यंत पोहोचतात आणि आपल्या कामाला लागतात. आपले काम संपविल्यानंतर ते रात्री १०-११ वाजेपर्यंत घरी पोहोचतात.
रात्रीचे जेवण
रात्री ११-१२ वाजेदरम्यान ते जेवण घेतात. त्यामध्ये डाळ, भात, पोळी, भाजी आणि सलाडचा समावेश असतो.
पत्नी, मुलांना वेळ
मुकेश अंबानी कामात कितीही व्यग्र असले तरी ते विशेष वेळेत आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतात. त्यांच्या प्रत्येक सुख-दुःखात सोबत असतात. रात्री १२-२ वाजेदरम्यान ते पत्नी नीता अंबानीसोबत खासगी आणि कामासंदर्भात गप्पा मारतात. दोन-अडीच वाजेपर्यंत ते झोपी जातात.
सिनेमाचा छंद
मुकेश अंबानी यांना बॉलिवूड चित्रपट पाहण्याचा छंद आहे. त्यामुळे ते बहुतांश सिनेमे प्रदर्शित होण्यापूर्वीच पाहतात.