दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील हनुमानवाडी शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. धीरज काळे,निवृत्ती देशमुख यांच्या शेतातील बांधावर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अखेर फसला आणि तो जेरबंद झाला. याच परिसरात आणखी दोन बिबटे असून त्यांना पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान बिबट्याला पकण्यात आल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला असला तरी दोन बिबट्यांची दहशत मात्र कायम आहे.









