India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

उद्या आहे लक्ष्मीपूजन! असे आहे महत्त्व आणि मुहूर्त

India Darpan by India Darpan
October 23, 2022
in साहित्य व संस्कृती
0

 

– पंडित दिनेश पंत
चेतन्याचे पर्व असलेल्या दिवाशीच्या उत्सवाला प्रारंभ झाला आहे. अतिशय चैतन्यमयी आणि मंगल अशा या उत्सवाची जणू वर्षभर वाट पाहिली जाते. उद्या लक्ष्मीपूजन होणार आहे. लक्ष्मीपूजनाचे मुहुर्त, महत्त्व आणि विशेष आपण आता जाणून घेऊया…

२४ ऑक्टोबर – सोमवार – नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन
अश्विन वद्य चतुर्दशी हा दिवळीचा तिसरा दिवस. या दिवशी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. कुबेर पूजन, अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन या दिवशी केले जाते. लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त सायंकाळी ६.४ मिनिटांपासून रात्री ८.३४ मिनिटापर्यंत आहे….
आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. नरकासूर राक्षसाच्या वधाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. यामागील कहाणी अशी आहे की, नरकासूर नावाचा असूर मानवांना पीडा देत होता. तेव्हा श्रीकृष्णाने त्याचा वध केला. मरताना नरकासुराने वर मागितला, की आजच्या तिथीला मंगल स्नान करणार्‍याला नरकाची पीडा होऊ नये. या दिवशी अभ्यंगस्नान करतात.
श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.

२६ ऑक्टोबर – बुधवार – बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा व भाऊबीज
दिवाळीचा हा शेवटचा दिवस आहे. यंदा  यमद्वितीया, बलिप्रतिपदा, भाऊबीज आणि दिवाळी पाडवा हे एकाच दिवशी साजरे होत आहेत. बली प्रतिपदा अर्थात दिवाळीतला पाडवा या दिवशी पत्नीने पतीचे औक्षण करावे. भाऊबीज म्हणजे बहिणीने भावाचे औक्षण करावे. बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस होय…
सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

Diwali Festival Laxmipujan Importance and Muhurta


Previous Post

भारताच्या ‘विराट’ विजयानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने शेअर केली ही भावनिक पोस्ट

Next Post

तब्बल ६० लाखांच्या पगाराची नोकरी सोडून तो विकतोय चहा; जाणून घ्या या तरुणाची ही यशोगाथा

Next Post

तब्बल ६० लाखांच्या पगाराची नोकरी सोडून तो विकतोय चहा; जाणून घ्या या तरुणाची ही यशोगाथा

ताज्या बातम्या

महारेराच्या अंमलबजावणीवर उठताहेत प्रश्न…बिल्डरांवर काही कारवाई होतेय का…

October 2, 2023

ग्रामीण विकास योजनांच्या निधीवरुन पश्चिम बंगाल व केंद्र सरकारमध्ये जुंपली, केंद्र सरकारने दिले हे उत्तर

October 2, 2023

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर इतके लाख लेखापरीक्षण अहवाल दाखल, प्राप्तिकर विभागाने मानले आभार

October 2, 2023

खंडणी मागायला आले अन् जाळ्यात अडकले

October 2, 2023
राशीभविष्य

या व्यक्तींनी निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्यावे, जाणून घ्या.. ३ ऑक्टोंबर २०२३चे राशिभविष्य

October 2, 2023

येवल्यात मुसळधार पाऊस; दुकान व घरात पाणी शिरले, दुचाकी रस्त्यावर आडव्या झाल्या (बघा व्हिडिओ)

October 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group