शुक्रवार, ऑगस्ट 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सायबर गुन्हे रोखण्यासाठी या महत्त्वपूर्ण उपक्रमांचा आज प्रारंभ

by Gautam Sancheti
सप्टेंबर 9, 2024 | 11:51 pm
in राष्ट्रीय
0
amit shah11

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे ‘ I4C’ म्हणजेच भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या पहिल्या स्थापना दिन समारंभाला संबोधित करणार आहेत आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी विविध प्रमुख उपक्रमांचा प्रारंभ करणार आहेत.

यावेळी गृहमंत्री सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटर(सीएफएमसी) अर्थात सायबर फसवणूक शमन केंद्राचे लोकार्पण करणार आहेत. सीएफएमसीची स्थापना नवी दिल्लीतील भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (आय4 सी) येथे प्रमुख बँका, वित्तीय मध्यस्थ, ‘पेमेंट एग्रीगेटर’, दूरसंचार सेवा प्रदाते, आयटी मध्यस्थ आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश कायदा अंमलबजावणी एजन्सीज (एलईएज्) यांच्या प्रतिनिधींसह करण्यात आली आहे. ऑनलाइन आर्थिक गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी त्वरित कारवाई आणि अखंड सहकार्यासाठी ते एकत्र काम करतील. सीएफएमसी कायद्याच्या अंमलबजावणीत “सहकारी संघीयवादाचे” चे उदाहरण म्हणून काम करेल.

याप्रसंगी अमित शाह समन्वय मंच (संयुक्त सायबर गुन्हे तपास सुविधा प्रणाली) सुरू करणार आहेत. या मंचाचे काम वेब -आधारित ‘समन्‍वय’ मॉड्यूलव्दारे चालणार आहे. सायबर गुन्‍हे , माहिती सामायिक करणे , क्राइम मॅपिंग, डेटा ॲनालिटिक्स, सहकार्य आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या देशभरातील एजन्सीमध्ये समन्वय यासाठी हा मंच वन स्टॉप पोर्टल म्हणून काम करेल.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री ‘सायबर कमांडोज’ कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. या कार्यक्रमांतर्गत देशातील सायबर सुरक्षेसंदर्भातल्या धोक्यांचा सामना करण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय पोलीस संघटनांमध्ये प्रशिक्षित ‘सायबर कमांडो’ची एक विशेष शाखा स्थापन केली जाईल. प्रशिक्षित सायबर कमांडो राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय एजन्सींना मदत करतील.या कार्यक्रमामध्‍ये अमित शाह ‘सस्‍पेट रजिस्ट्री’ चे उद्घाटन करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सायबर सुरक्षित भारत’चे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेला हा उपक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. भारतीय सायबर गुन्‍हे समन्‍वय केंद्राची (आ4सी ) स्थापना 5 ऑक्टोबर 2018 रोजी करण्यात आली आहे. या केंद्राचे प्राथमिक उद्दिष्ट देशभरातील सायबर गुन्ह्यांशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय-स्तरावर समन्वय स्थापन करणे हे आहे. आय4 सी चे उद्दिष्ट कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीच्या क्षमता वाढवणे आणि सायबर गुन्ह्यांचा शोध, तपास करणा-या संबंधित विविध भागधारकांमधील समन्वयामध्‍ये सुधारणा घडवून आणणे हा आहे.
हा कार्यक्रम 10 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता आय4 सीच्या ‘Cyberdost’ या अधिकृत Youtube वाहिनीवरून थेट प्रसारित केला जाणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची एकमताने फेरनिवड

Next Post

वंदे भारत बंद पडली, अखेर मालगाडीचे इंजिन लावले, ७५० प्रवासी ताटकळले…जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ शेअर करत केली ही टीका

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Untitled 38

वंदे भारत बंद पडली, अखेर मालगाडीचे इंजिन लावले, ७५० प्रवासी ताटकळले…जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ शेअर करत केली ही टीका

ताज्या बातम्या

ed

ईडीने राज्यातील या सहकारी बँकेची ३८६ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता केली परत…

ऑगस्ट 1, 2025
image003BZH6

ऐतिहासिक पाऊल…या बंदरात स्वदेशी बनावटीचा १ मेगावॅटचा हरित हायड्रोजन कारखाना सुरु

ऑगस्ट 1, 2025
ECI response 1024x768 1 e1741738630767

ईव्हीएम छेडछाड अशक्य; राज्यातील या १० विधानसभा मतदार संघात केली तपासणी

ऑगस्ट 1, 2025
सुपर स्पेशालिटी प्राणी रुग्णवाहिकेचे लोकार्पण 2 1024x576 1

आता प्राण्यांच्या सेवेसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णवाहिका….मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण

ऑगस्ट 1, 2025
railway 1

छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्राची मंजुरी…इतक्या कोटींचा निधी मिळाला

ऑगस्ट 1, 2025
CM

कर्नाटक शासनाने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये…मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्राद्वारे केंद्रीय मंत्र्याना केली हस्तक्षेपाची विनंती

ऑगस्ट 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011