नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्वर्गीय लता मंगेशकर यांचा निस्सीम चाहता वर्ग कसा असू शकतो व तो काय करु शकतो. याचं एक उत्तम उदाहरण नुकतेच लता मंगेशकरांच्या एका श्रद्धांजलीपर कार्यक्रमा प्रसंगी बघायला मिळाल. या घोषणे बद्दल उपस्थितांना आश्चर्याचा सु:खद धक्काही बसला. भारतरत्न व देशाच्या गान कोकिळा स्वर्गीय लता मंगेशकर यांचा नाशिक येथे श्रद्धांजलीपर कार्यक्रमाप्रसंगी भाऊक झालेल्या त्यांच्या एका चाहत्याने चक्क त्यांच्या जीवनावर आधारित “मल्टीस्टार” असा “बिग बजेट” मराठी चित्रपट तयार करण्याची चक्क घोषणा केली. खऱ्या अर्थाने ही आगळी वेगळी व अनोखी श्रद्धांजली स्व. लता मंगेशकरांना वाहिल्याची चर्चा यावेळी उपस्थित चाहत्यां वर्गामध्ये व्यक्त होताना दिसली.
प्रा. डॉ.सुरेश सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचे आयोजन नाशिक मधील एका ठिकाणी करण्यात आले होते. डॉ. सोनवणे यांच्या परिवारातील चार पिढ्यांपासून लता दीदींचे निस्सम चाहते व श्रोते आहेत. डॉ. सोनवणे यांचे नुकतेच प्रकाशित झालेल्या पुस्तकावर चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नव्हे तर चित्रपटाच्या तयारीला देखील ते लागले होते. परंतु अचानक स्वर्गीय लतादीदी यांचे निधन झाल्याने भाऊक झालेल्या डॉ. सोनवणे यांनी अचानक श्रद्धांजलीपर कार्यक्रमात आपला चित्रपट बाजूला करून स्व. लता दीदींच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा केल्याने त्यांच्यातील दीदींच्या बद्दलचे प्रेम यानिमित्ताने प्रकट झाल्याचे बघायला मिळाले. तर चित्रपट येणार म्हणून लतादीदींच्या चाहात्यानी देखील समाधान व्यक्त केले आहे. यावेळी डॉ. सोनवणे यांनी माझ्या सारखा पामर एवढे मोठे धाडस करत असून याकरिता माझी सर्व जमापुंजी खर्च झाली तरी चालेल त्यात कोणताही पश्चाताप नाही असंही भाऊक होउन सांगितलं.