योगेश सगर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
लासलगाव येथे ठार झालेल्या चार कर्मचारी यांच्या निषेधार्थ रेल्वे कर्मचाऱ्यांनी लासलगाव रेल्वे स्थानकावरील रेल्वे रुळावर उतरून आंदोलन केले. त्यामुळे नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी मुंबईकडे जाणारी गोदावरी एक्सप्रेस १० मिनिटे रोखण्यात आली. रेल प्रशासन मुर्दाबाद, ट्रॅकमन एकता झिंदाबाद अशा घोषणा कर्मचाऱ्यांनी दिला. दुर्घटना घडून तीन तास घडले तरी वरिष्ठ अधिकारी न आल्याने कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
निफाड तालुक्यातील मध्य रेल्वे मार्गावरील लासलगाव रेल्वे स्थानकावर सकाळी पावणे सहा वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला असून इंजिन टावर च्या धडकेत चार गॅंग मॅन चा मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की लासलगाव रेल्वे स्थानकावर आज (दि. १३) रोजी पहाटे 5.44 वा दरम्यान टॉवर (लाईट दुरुस्त करण्याचे इंजिन) रॉग डायव्हरशने लासलगाव बाजूने उगावकडे जात होते. किमी २३० व पोल नंबर १५ ते १७ मधील ट्रॅक मेंटन (ब्लॉक तयारी) करण्याचे काम सुरू होते. सदर काम खालील ट्रक मेंटेनर कर्मचारी काम करत असताना त्याना रेल्वे लाईनची मेंटनेस करणारे टॅावरने धडक दिल्याने अपघातात जबर मार लागण्याने मयत झाले आहे.
मृतांमध्ये संतोष भाऊराव केदारे (वय 38 वर्षे), दिनेश सहादु दराडे (वय 35 वर्षे), कृष्णा आत्मराम अहिरे (वय 40 वर्षे) ,संतोष सुखदेव शिरसाठ (वय 38 वर्षे) यांचा समावेश आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वे मार्गावर अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे, तर भल्या पहाटे अशी दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण लासलगाव शहर हळहळले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांमध्येही या दुर्घटनेमुळे संतापाची लाट आहे.
Lasalgaon Railway Employee Agitation on Track