लासलगाव – शेतकऱ्यांचा शेतीमाल इतर राज्यात पोहोचवण्यासाठी रेल्वेकडून खरंतर अनुदानात किसान रेल सुरू करण्यात आली आहे मात्र याचा फायदा कांद्याची नगरी लासलगाव व परिसरातील शेतकऱ्यांना होत नसल्याचे रडगाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लासलगाव येथे रेल्वे स्टेशनच्या तपासणी कामी आलेले भुसावल मंडल चे प्रबंधक एस एस केडिया यांच्याकडे मांडले. किसान रेल योजनेअंतर्गत ३० मार्च ते २० मे पर्यंत किसान रेलचे रॅक बुक करण्यात आले होते. मात्र अद्यापही किसान रेलचे रॅक उपलब्ध न झाल्याने कांद्यासह शेती मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे बदलत्या वातावरणामुळे चाळीत साठवलेला कांदा मोठ्या प्रमाणात खराब होत असल्याने लवकरात लवकर किसान रेलचे रॅक उपलब्ध करण्याची मागणी भुसावल मंडलचे प्रबंधक एस एस केडिया यांच्याकडे यावेळी शेतकऱ्यांनी केली. यावेळी डी आर एम -एस एस केडीया ,सिनियर डी इ एन राहुल अग्रवाल, डी सी एम – अरुण कुमार, एडीइएन मनमाड विशाल डोळस, एसीएम मीना हे रेल्वे ऑफिसर उपस्थित होते.
जि. प.सदस्य डी.के.नाना जगताप यांनी दिले निवेदन
लासलगाव -मध्य रेल्वेचे भुसाव॓ळचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर (मध्य रेल्वे भुसावळ) एस.एस.केडीया यांना जि. प.सदस्य डी.के.नाना जगताप यांच्या तर्फे लासलगावच्या प्रलंबित प्रश्नाचे निवेदन सादर करण्यात आले. डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांनी आज लासलगाव येथे रेल्वे स्टेशन ला भेट दिली असता लासलगाव कोटमगाव येथील रेल्वे लाईनच्या पुलाखाली कि. मी.२३३ पोल नं.३ व ५ जवळ दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते त्यामुळे सदर पुलाखालील राज्यमार्गाचा भाग हा गेल्या काही वर्षांपासून पावसाने पूर्णपणे खचून गेला असुन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने परिसरातील शेतकरी ,विद्यार्थी, व नागरिकांना येजा करभेटण्यासाठी ण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते .त्यामुळे गेट १०४कि. मी.२३३ पोल नं.३व५ येथे आपण नवीन R U B (रेल्वे अंडर ब्रिज )अथवा नवीन गेटची व्यवस्था करून देण्यात यावी व गोदावरी एक्सप्रेस चालू करणे व कामयानी एक्सप्रेस थांबा मिळण्यासाठी निवेदन देण्यात आले ,त्यावेळीडी आर एम साहेबांनी यावर लवकरात लवकर तोडगा काढू असे सांगितले.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णाताई जगताप, कोटमगाव चे कव तुकारामजी गांगुर्डे, भुसावळ मंडल रेल्वे सल्लागार सदस्य राजाभाऊ चाफेकर, सरचिटणीस नितीनजी शर्मा, निलेश लचके, गणेश सानप, खिलवानी, मंडल अध्यक्षा स्मिताताई कुलकर्णी, जिल्हा चिटणीस ज्योतीताई शिंदे, मंडल उपाध्यक्ष रुपाताई केदारे हे उपस्थित होते. रेल्वे डिव्हीजनल मॅनेजर एस.एस.केडीया यांचे स्वागत करतांना जि.प. सदस्य डी.के.जगताप लासलगाव बाजार समिती सभापती सौ. सुवर्णाताई जगताप, राजेंद्र चाफेकर व मान्यवर उपस्थितीत होते.