विद्युलता या निफाडचे तत्कालीन पोलिस उप्अधिक्षक बी.जी.शेखर पाटील यांच्या पत्नी
लासलगाव – निफाडचे तत्कालीन पोलिस उप्अधिक्षक व नवी मुंबई येथील अप्पर पोलिस आयुक्त बी.जी.शेखर पाटील यांच्या सुविद्य पत्नी.सौ विद्युलता बाळासाहेब शेखर पाटील यांना काल पुणे येथे रस्ते सुरक्षा व अपघात प्रतिबंध उपाय योजना या विषयावर पुणे विद्यापीठाने पीएचडी पदवी प्रदान केली आहे.
अशा प्रकारच्या सामाजिक बांधिलकी असलेल्या विषयातील पदवी मिळविणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्याच महिला आहेत
सौ.विद्युलता शेखर यांनीइंजिनिअर पदवी पासून ते PhD पर्यंत त्यांनी आजतागायत एकूण नऊ पदव्या ग्रहण केल्या आहेत. पोलीस खात्यातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची पत्नी या नात्याने सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी हे यश प्राप्त केले आहे. अनाथ व गरीब मुलांचे शिक्षण करणे ,अनाथ आश्रमातील विध्यार्थ्यांना गणित व शास्त्र विषय शिकविणे, वृक्षारोपण व रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती करणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि वयोवृद्ध लोकांना मदत करणे हा त्यांचा स्थायिभाव आहे. या यशाबद्दल त्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.