लासलगांव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लासलगाव येथील ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी तोडून तेथून पळ काढला होता. मात्र या घटनेची खबर पोलिसांना लागतात पोलिसांनी तात्काळ परिसरामध्ये नाकाबंदी करत पुढील तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर नाकाबंदी केली. त्यामुळे चोरट्यांनी तोडून नेलेले एटीएम रस्त्यावर फेकत पळ काढला.
पोलिसांच्या नाकाबंदीमुळे लासलगाव येथील एटीएम मशीन चोरीचा प्रयत्न फसला आज पहाटे चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
दरम्यान लासलगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन एटीएम मशीन ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी शेख यांना तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.